Homeताज्या बातम्यालोणी काळभोर येथे वेश्याव्यवसायावर छापा; हॉटेल मॅनेजरसह दोन आरोपी अटकेत, दोन महिलांची...

लोणी काळभोर येथे वेश्याव्यवसायावर छापा; हॉटेल मॅनेजरसह दोन आरोपी अटकेत, दोन महिलांची सुटका

पुणे | प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत हॉटेल मॅनेजर व वेटरसह दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे–सोलापूर रोडवरील कडील टोलनाका परिसरात असलेल्या जयश्री एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट बार अँड लॉजिंग येथे करण्यात आली.
दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता, लोणी काळभोर पोलिसांना सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. छाप्यादरम्यान हॉटेलचा मॅनेजर मोहन कसनू राठोड (वय 40) व वेटर गणेश दत्ता चिलकेवार (वय 25) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
छाप्यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना जबरदस्तीने व आर्थिक आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन व कंडोम पॅकेट्स असा एकूण ₹54,800/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायदा 1956 अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांना पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे पाठवण्यात आले आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरात बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक | पुणे बातम्या

पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. पुणे बातम्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

error: Content is protected !!