पुणे:
लोहगाव परिसरातील कलवड वस्ती येथे एका महिलेची सोन्याची चैन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ ने अवघ्या ८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास कलवड वस्ती, गणराज चौक, लोहगाव येथे एक महिला पायी जात होती. यावेळी दोन अनोळखी इसमांनी संगनमताने महिलेला गाठून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली होती.
तपासाची चक्रे आणि अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट ७ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची कसून तपासणी केली. फुटेजवरून आरोपींचे फोटो प्राप्त केल्यानंतर, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. हाशिम खलील शेख (वय २० वर्षे, रा. शिफा हॉस्पिटल मागे, कलवड वस्ती, लोहगाव, पुणे)
२. आसिफ इक्बाल शेख (वय १९ वर्षे, रा. शिफा हॉस्पिटल मागे, कलवड वस्ती, लोहगाव, पुणे)
कायदेशीर कारवाई व मुद्देमाल
आरोपींविरुद्ध लोहगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत १०,००० रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे.
तपास पथक
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. विवेक मासाळ (अतिरिक्त कार्यभार) आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मदन कांबळे, पोलीस अंमलदार विनायक साळवे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, ऋषीकेश ताकवणे आणि महिला पोलीस अंमलदार सोनाली नरवडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























