Homeक्राईमवक्फ जमिनीवर हजारो कोटींचा घोटाळा उघड! पुण्यात Miss Farha Charitable Foundation कडून...

वक्फ जमिनीवर हजारो कोटींचा घोटाळा उघड! पुण्यात Miss Farha Charitable Foundation कडून पहिली FIR दाखल

वक्फ जमिनीवर हजारो कोटींचा घोटाळा उघड! पुण्यात Miss Farha Charitable Foundation कडून पहिली FIR दाखल

पुणे | दि. २५ जुलै २०२५ — पुणे शहरातील बाणेर भागात वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील मौल्यवान जमिनीच्या विक्रीमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणात Miss Farha Charitable Foundation कडून वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, सीईओ जुनेद सय्यद, Panacea Hill Co-operative Housing Society, उपनिबंधक (Haveli 15), तसेच इतर अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीसह ऑनलाईन एफआयआर (Police Complaint No: 19393049072500108) सुद्धा दाखल झाली असून, यामध्ये आर्थिक उलाढालींबरोबरच हवाला व्यवहारांचीही शक्यता असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेच्या अगदी शेजारी असलेल्या बाणेर (Survey No. 9/1/1 आणि 9/1/2) मधील 18.15 एकर वक्फ जमिनीचा बाजारभाव ₹1200 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. ही जमीन फक्त ₹9.5 कोटी रुपयांना २००६ साली एका सहकारी गृहनिर्माण संस्थेला विकण्यास परवानगी देण्यात आली. विक्रीनंतर ₹७ कोटी वक्फ बोर्डाला २००९ पर्यंत मिळणे अपेक्षित होते. परंतु, आजतागायत वक्फ बोर्डाला एकही रुपया प्राप्त झालेला

सद्य स्थितीत त्यांची एकूण बाजार किंमत हजारो कोटींमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार वक्फ जमिनीच्या विक्री संदर्भातील Waqf Act 1995 च्या कलम 51 चे सरळ उल्लंघन आहे.

वक्फ म्हणजे श्रद्धेची संपत्ती – आणि तिचा अपमान हा संपूर्ण समुदायावर हल्ला

“वक्फ म्हणजे लोकांच्या श्रद्धेची संपत्ती. तिच्यावर डल्ला म्हणजे केवळ आर्थिक भ्रष्टाचार नाही, तर एका धर्माच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांवरचा हल्ला आहे.” असे मत Miss Farha Charitable Foundation ने प्रसारित केलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आले.

Miss Farha Charitable Foundation ने उचललेला पुढाकार:
• RTI व्दारे माहिती मागवली: बाणेर जमिनीच्या विक्रीतील व्यवहार, त्यावरील नोटरी व मंजुरीचे दस्तऐवज, आणि पैसे कधी, कुठे व कोणाला देण्यात आले याची माहिती RTI द्वारे वक्फ बोर्ड व Haveli सब-रजिस्ट्रार कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.
• मुख्यमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, जिल्हाधिकारी व इतर यंत्रणांना पत्र: या संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी शासनस्तरावर सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
• पोलिसात तक्रार दाखल व FIR: वक्फ जमिनीच्या हेराफेरीवर आधारित पहिली ऑनलाईन FIR दाखल करून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही केवळ एक जमिनीची विक्री नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या श्रद्धेचा विश्वासघात आहे. वक्फ संपत्ती ही अनाथ, विधवा, गरीब व उपेक्षितांसाठी असते. तिचा गैरवापर म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. आम्ही जनतेला विनंती करतो की त्यांनी या घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठवावा, आणि शासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी पाठिंबा द्यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील रोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद | पुणे बातम्या

पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेचा कोणताही गट अस्तित्वात नाही : शहा | पुणे बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

error: Content is protected !!