Homeताज्या बातम्याविमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व...

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त

​पुणे पोलिसांचे ‘मिशन क्रॅकडाऊन’ सुरूच: विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त
​पुणे (प्रतिनिधी):
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ चे श्री. अबिनाश कुमार (IPS) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहिमेअंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
​कारवाईचा सविस्तर तपशील:
दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास (०४.३० वा.), विमानतळ पोलीस ठाण्याचे रात्रगस्त अधिकारी पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर व त्यांचा स्टाफ गस्त घालत असताना, न्यू एअरपोर्ट रोड येथील ‘बॅक बेंचर हॉटेल अँड रेस्टॉरंट’ हे विहित वेळेपेक्षा उशिरापर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले.
​सदर हॉटेलमध्ये विहित वेळेचे उल्लंघन करून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी २४ पुरुष व ६ महिला अशा एकूण ३० व्यक्तींना बीअर व मद्य प्राशन करण्यासाठी मद्यविक्री व मद्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे आढळून आले.
​जप्ती व कायदेशीर कारवाई:
​या धडक कारवाईत पोलिसांनी हॉटेलचे मालक तसेच हॉटेलमधील ०५ कामगार यांना ताब्यात घेतले आहे.
​हॉटेलमधील बेकायदेशीर मद्यसाठा आणि म्युझिक सिस्टीम जप्त करण्यात आली आहे.
​मद्यप्राशन करणाऱ्या सर्व पुरुष व महिलांची वैद्यकीय तपासणी आणि अल्कोहोल टेस्ट (Medical & Alcohol Test) पूर्ण करण्यात आली असून, संबंधितांविरुद्ध लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
पुणे शहर, झोन-७ अंतर्गत पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, विहित वेळेचे उल्लंघन, बेकायदेशीर मद्यविक्री आणि नियमबाह्य पार्टी/आस्थापनांविरुद्धची ही मोहीम अशीच कठोरपणे सुरू राहणार आहे. परिसरामध्ये गुन्हेगारी टोळ्या, अवैध गुटखा विक्री, अमली पदार्थ, अवैध दारू, जुगार किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांविषयी माहिती असल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल:
​श्री. अबिनाश कुमार, IPS (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७): 88020 07938
​स.पो.नि. गोरक्षनाथ खरड (विशेष पथक, झोन-७): 9922717999
​पो.उप.नि. नितीन राठोड (विशेष पथक, झोन-७): 9922744599
​”आपली एक माहिती, गुन्हेगारीविरुद्ध मोठी कारवाई घडवू शकते. सुरक्षित, व्यसनमुक्त आणि गुन्हेमुक्त पुण्यासाठी पुणे पोलिसांना सहकार्य करा..”
— (अविनाश कुमार) भा.पो.से., पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-७, पुणे शहर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

error: Content is protected !!