Homeक्राईमशहरध्यक्षांच्या कार्यालयात वीजचोरी, माहितीअधिकारात उघड.भाजप शहराध्यक्षाचे कार्यालय आणि व्यायामशाळा वीजचोरीत सापडले.

शहरध्यक्षांच्या कार्यालयात वीजचोरी, माहितीअधिकारात उघड.भाजप शहराध्यक्षाचे कार्यालय आणि व्यायामशाळा वीजचोरीत सापडले.

*पुणे भाजप शहरध्यक्षांच्या कार्यालयात वीजचोरी, माहितीअधिकारात उघड.भाजप शहराध्यक्षाचे कार्यालय आणि व्यायामशाळा वीजचोरीत सापडले.

पुणे:- भाजप शहराध्यक्ष यांचे सानेगुरुजी नगर, आंबील ओढा येथील कार्यालय आणि त्यांचीच भ्रष्टाचारात अडकलेली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र वीजचोरीत अडकले असल्याची माहिती अधिकारात उघड झाल्याने काँग्रेस- शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, आज काँग्रेस – शिवसेना एकत्र शिष्टमंडळाने महावितरण पुणे परिमंडळ चे मुख्य अभियंता सुनील काकडे यांची भेट घेऊन त्यांना घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्तीच झाडली. सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि पुणे भाजप च्या शहराध्यक्षाला वेगळा न्याय का? वीजचोरी उघड होऊनही कारवाई का नाही? गेले अनेकवर्ष सदर प्रकरण का दाबण्यात आले? असे अनेक प्रश्न विचारले गेले.

पुणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्र २९ मधील भाजप शहराध्यक्षांचा तीन व्यायामशाळांचा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार विषय आज पुण्यात गाजत असताना माहिती अधिकारात अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे, आणि ह्या भ्रष्टाचारात महावितरण च्या पेशवे पार्क उपविभाग चा महत्वाचा वाटा आहे हे सिद्ध झाले आहे.
सानेगुरुजी नगर, आंबील ओढा कॉलनी येथील पुणे शहरातील नामवंत भाजप शहरअध्यक्ष , माजी नगरसेवक ह्यांचे कार्यालय, व अंदाजे ३००० प्रति चौरसफूट असणारी भव्य दुमजली कै भानुदास गेजगे व्यामशाळा, तसेच विरंगुळा केंद्र अश्या पुणे मनपाच्या वास्तू सन २०१२ पासून अस्तित्वात असून माहिती अधिकारात माहिती घेतल्यावर हे लक्षात आले की सदर वास्तू पुणे मनपा क्रीडा व मालमत्ता विभागाकडे ९ एप्रिल २०२५ पर्यंत हस्तांतरित करण्यात आल्याच नाही असे असताना ही सन २०१२ पासून सदर तीनही वास्तूंना विजपुरवठा होत आहे,

माहिती अधिकारात माहिती मागविली असता २६/०४/२५ च्या महावितरण पेशवे पार्क उपविभाग कार्यालयातील स्थळ पाहणी अहवालात असे वीजचोरीचे प्रकार निदर्शनास आले आहे, आणि महावितरण पेशवे पार्क विभाग ने त्यांना फक्त १ वर्षाचा दंड ९५,३३०/-₹ आकारला आहे पण मागील १२ वर्षाची थकबाकी का वसूल केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे , तसेच माहिती अधिकारात मिळालेल्या स्थळ पाहणी अहवालात ही अनेक त्रुटी मुद्दाम महावितरण च्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत जेणेकरून स्थानिक भाजप नगरसेवकाला , शहराध्यक्षाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, स्थळ पाहणी अहवालात वीज दंडाची रक्कम कमी करण्यासाठी व्यायामशाळेतील काही मशीन आणि अनेक एयर कंडीशनर चा उल्लेख ही टाळण्यात आला आहे.
स्थळ पाहणी अहवालात भाजप कार्यालय तसेच स्थानिक नगरसेवक यांचे नाव गाळून फक्त कार्यालय” शब्दाचा उल्लेख केला आहे, वीज वापर मधे पब्लिक सर्व्हिस असे नमूद केले आहे पण सदर ठिकाणी शेकडो मुलांकडून व्यायामासाठी पैसे घेतले जातात त्यामुळे हा पब्लिक सर्व्हिस प्रकार नसून व्यावसायिक आहे, तसेच सदर स्थळ पाहणी अहवालात महावितरण च्या अधिकाऱ्यांकडून मुद्दाम पुन्हा स्थानिक सत्ताधारी भाजप नगरसेवकाला वाचवण्यासाठी कोणत्यातरी त्रयस्थ व्यक्तीचे नाव चालक म्हणून टाकण्यात आले आहे, सदर व्यायामशाळा ही नगरसेवक स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत चालवित आहेत तसेच सानेगुरुजी नगर मधील भाजप कार्यालय हे स्वतः नगरसेवक अनेक वर्ष वापरीत आहेत तसे त्या वास्तूवर त्यांचे नावही आहे, तिथेही अनेक अद्यावत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आहेत असे असताना त्यांचा उल्लेख महावितरण च्या अधिकाऱ्यांकडून टाळण्यात आला आहे ही महाराष्ट्र शासनाची फसवणूक महावितरण च्या पेशवे पार्क उपविभाग अधिकाऱ्यांकडून केली जात आहे . म्हणजेच भ्रष्टाचारास महावितरण विभाग ही तितकाच जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी केला आहे.

तसेच दिनांक १६/०४/२५ च्या माहिती अधिकारात सदर कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर , लोकमान्य नगर व्यायामशाळा, आणि कै चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा, शाळा क्रमांक १७, नवी पेठ पुणे ३० , या पुणे मनपाच्या व्यायामशाळा मालमत्तेची विज मीटर ची बिले मागवली असताना महावितरण कडून माहिती अधिकारात मयत व्यक्तींची बिले देण्यात आली अश्या प्रकारे माहिती अधिकारात माहिती घेणाऱ्या ची फसवणूक पेशवे पार्क उपविभाग कार्यालय कडून केली गेली आहे .
सामान्य माणसाला ५००/-₹ नाही वेळेवर भरले तर विज तोडणारे महावितरण चे अधिकारी ह्या विषयात गेले १३ वर्ष शांत का आहेत त्यांना ही भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का हा प्रश्न आहे,
त्यामुळे लवकरच तक्रारदार यांनी सदर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग पुणे पोलिस आयुक्त यांस तक्रार करणार आहेत , तसेच महावितरणने ही आपल्या महावितरणच्या अश्या भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी वीजचोरी साठी साथ देण्यास जबाबदार म्हणून कठोर कारवाई करावी मागील १२ वर्षाची थकबाकी तत्पर वसूल करावी तसेच वीजचोरी करणाऱ्या स्थानिक भाजप नगरसेवकावर तत्पर गुन्हा दाखल करण्यासाठी कारवाई करावी,
अन्यथा आम्हाला सदर भ्रष्टाचाराच्या विरोधात , वीजचोरी विरोधात महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करावे लागेल आणि वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई सुरू करावी लागेल असे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाकडून कळविण्यात आले .
यावेळी बोलताना मुख्य अभियंता काकडे यांनी सदर वीजचोरी विषयात कडक कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिले .

यावेळी शिष्टमंडळात किशोर मारणे शहर अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संघटन पुणे, अक्षय जैन – जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस, अनंत घरत शिवसेना प्रसिद्धी प्रमुख,
सागर धाडवे सरचिटणीस युवक कॉंग्रेस पुणे, कुणाल काळे- युवक काँग्रेस उपाध्यक्ष पुणे, अविनाश अडसूळ – पुणे शहर सचिव, हनुमंत गायकवाड उपाध्यक्ष कोथरूड विभाग हे उपस्थित होते.
सदर भ्रष्टाचाराची माहिती कांग्रेस कार्यकर्ते तक्रारदार सागर धाडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांस ह मेल द्वारे पाठविली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

error: Content is protected !!