शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी
शिक्रापूर / पुणे :
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या व सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २७ वर्षे, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) या धोकादायक सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए – MPDA) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यास ताब्यात घेऊन अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे. 
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये मागील ५ वर्षांत संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील जामिनावर मुक्त झालेले आरोपी व त्यांच्यावर नव्याने दाखल गुन्ह्यांचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी दिले होते. त्यानुसार दरोडा, जबरी चोरी, महामार्गावरील लूटमार, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत खालीलप्रमाणे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत:
संगनमत करून घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवून शिवीगाळ व दमदाटी करणे.
संगनमत करून खून व खुनाचा प्रयत्न करणे.
संगनमत करून जबरी चोरी करणे व जबरी चोरीचा माल विक्री करणे.
संगनमत करून घातक हत्यारांनी दुखापत पोहोचवून अन्यायाची आगळीक करणे.
दुखापत, हल्ला किंवा गैरपणे परिरोध करण्याची पूर्वतयारी करून गृहअतिक्रमण करणे व दमदाटी करणे.
आरोपीवर जुना भारतीय दंड विधान प्रकरण १६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे प्रकरण ६ व १७, तसेच भारतीय हत्यार कायदा १९५९ चे प्रकरण ५ अंतर्गत गुन्हे नोंद आहेत.
कारवाईची प्रक्रिया
आरोपी सराईत व धोकादायक असल्याने तत्कालीन प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे एमपीडीएचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षकांच्या अवलोकनानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला.
पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर, काळा बाजार करणारे, बेकायदेशीर जुगार/लॉटरी चालवणारे व मानवी अपव्यापार प्रतिबंधक मुख्य अधिनियम १९८१ (सुधारणा अधिनियम २०२५ चा महा. अधि. क्र. २९)’ अन्वये आदेश (क्रमांक: पगम/एम पी डि ए/एस आर/१६/०१/२०२६, दि. २०/०८/२०२६) पारित केला.
त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शोध घेऊन सुरज ऊर्फ मोन्या देडगे याला दि. २३/०८/२०२६ रोजी ताब्यात घेतले आणि मध्यवर्ती कारागृह अकोला येथे स्थानबद्ध केले.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
सदरची कामगिरी खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वी केली:
मार्गदर्शन: मा. श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. शुभम कुमार (अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग), मा. रवींद्र भोसले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग).
तपास व अंमलबजावणी पथक: श्री. प्रमोद क्षीरसागर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), श्री. चंद्रशेखर यादव (पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस स्टेशन), श्री. उमाकांत कुंजीर (पोलीस उपनिरीक्षक), जितेंद्र पानसरे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक), महेश बनकर (सहा. पोलीस उपनिरीक्षक).
अंमलदार: स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण (शिरूर विभाग पथक) तसेच पोलीस हवा. रोहिदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे आणि पोलीस अंमलदार नारायण वाळके (शिक्रापूर पोलीस स्टेशन).

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























