Homeताज्या बातम्यासिंहगड किल्ल्यावर आक्षेपार्ह बॅनर लावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; दोषींवर कारवाईचे...

सिंहगड किल्ल्यावर आक्षेपार्ह बॅनर लावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; दोषींवर कारवाईचे आश्वासन

पुणे ग्रामीण पोलिसांकडून आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संबंधित बॅनर सिंहगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील वाहनतळ (Parking Area) शेजारी असलेल्या जुन्या लोखंडी फलकावर अज्ञात व्यक्तींनी लावला होता.

स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संबंधित बॅनर तात्काळ हटविण्यात आला.

या बॅनरचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून मा. संदीप सिंह गिल (IPS), पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. शुभम कुमार (IPS), अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मा. सुनील पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (हवेली विभाग), मा. वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रूम यांना छायाचित्रांसह सविस्तर तक्रार पाठविण्यात आली. याशिवाय पोलीस कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवरही माहिती देण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलिसांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार, सदर बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रवेश व निर्गमन मार्गावरील (Entry–Exit) सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करेल. संस्था पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादाचे स्वागत करते आणि निष्पक्ष तपास व कायद्यानुसार कारवाईची अपेक्षा व्यक्त करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू; सुप्रिया सुळे मुंबई, दि.५ (शशिकांत पाटोळे) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात...

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त औंधमध्ये भव्य रक्तदान शिबिर; जनसंपर्क कार्यालयाचेही उत्साहात उद्घाटन पुणे, औंध-बोपोडी दि.५ (शशिकांत पाटोळे) : केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना...

स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न २०० डॉक्टरांची उपस्थिती; डॉ. परवेझ ग्रँट यांना प्रथम ‘स्वराज्य आरोग्यभूषण पुरस्कार २०२६’ वाघोली : स्वराज्य डॉक्टर्स असोसिएशनचा २०२६–२०२८ या...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या;...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: दरोडा, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या; १२ गुन्हे उघडकीस! ​पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२६) - पुणे ग्रामीण...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड ​पुणे: मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत...

error: Content is protected !!