पुणे:
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कारवाई करत रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराकडून देशी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार करण्यात आली आहे.
घटनेची सविस्तर माहिती:
दिनांक ३० जुलै २०२६ रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करण्याचे काम सुरू होते. या दरम्यान तपास पथकाचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार विनायक मोहिते व सागर शेडगे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून एक खात्रीशीर बातमी मिळाली.
बातमीनुसार, रेकॉर्डवरील आरोपी दादया घोलप याच्याकडे एक गावठी पिस्टल असून, तो इंडीयन ऑईल पेट्रोल पंपा समोरील नवीन डीपी रोड, कल्पतरू ब्लॅसम सोसायटीचे लेबर कॅम्प जवळ, सनसिटी रोड, पुणे येथे थांबला आहे. तसेच त्याने अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅकपॅन्ट घातली असल्याचे समजले.
आरोपीची धरपकड आणि जप्ती:
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. वर्णनानुसार इसम त्या ठिकाणी उभा असल्याचे दिसून आल्याने, वरील स्टाफच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव यश उर्फ दादया कमलाकर घोलप (वय १८ वर्षे, रा. आझाद मित्र मंडळ जवळ, चरवडवस्ती, वडगाव बु., पुणे आणि गावडे बिल्डिंग, दिघे टॉवर समोर, जाधवनगर, वडगाव बु., पुणे) असे असल्याचे सांगितले.
सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशानेच थांबला असल्याची खात्री पटल्याने, पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्याच्याजवळ खालील मुद्देमाल आढळून आला:
गावठी पिस्टल: किंमत ४०,०००/- रुपये.
एक जिवंत काडतूस: किंमत १,०००/- रुपये.
अंगझडतीत शस्त्र मिळाल्यामुळे त्याच्यावर सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगडरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करीत आहेत.
मार्गदर्शन व सहभागी पथक:
सदरची यशस्वी कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
श्री. राजेश बनसोडे (मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर)
डॉ. सागर कवडे (मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ-३, पुणे शहर)
श्री. विजय कुंभार (मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, पुणे शहर)
श्री. विनय पाटणकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
श्री. समीर गायकवाड (पोलीस निरीक्षक, गुन्हे)
तपास पथकातील अंमलदार:
पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्यासह पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, सतिश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, संदिप कांबळे, समीर माळवदकर, तानाजी सागर आणि शिरीष गावडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,




















