Homeताज्या बातम्या१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे:
पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे अंतर्गत शोध घेत असताना, दिनांक ०८/०९/२०२६ रोजी पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे यांना गोपनीय बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक ८४८/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) मधील रेकार्डवरील पाहिजे असलेला आरोपी राजु जावळकर हा डोणजे फाटा परिसरात फिरत आहे.
​सदर बातमी गुन्हे शाखा युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांना कळविण्यात आली असता, त्यांनी त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीनुसार डोणजे, पुणे येथून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
​पकडण्यात आलेल्या पाहिजे आरोपीचे नाव राजु बाबुराव जावळकर (वय ६० वर्षे, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेन्ट, फ्लॅट नंबर ४०८, डोणजे फाटा, पुणे) असे आहे. त्यास पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. हा नमूद आरोपी अभिलेखावरील वाहन चोरी करणारा गुन्हेगार असून, मागील ३० वर्षांपासून त्याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, अहिल्यानगर व इतर ठिकाणी १०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
​पोलीस पथकाची कामगिरी:
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सपोनि स्वप्नील लोंढे, मपोउप तेजश्री पवार, तसेच पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, उज्ज्वल मोकाशी, कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संतोष टकले, विजय पवार, शंकर कुंभार, संदीप शिर्के, नागनाथ राख, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे आणि विनायक वगारे या संपूर्ण पथकाने केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा – खासदार रवींद्र चव्हाण...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा - खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती...

पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: समर्थ पोलीस ठाण्यातर्फे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त; जळगावच्या...

​पुणे: पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सराईत...

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गांजा तस्करीतील...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करणाऱ्या आणि मागील तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या एका...

मुंढवा पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: अटक दोन आरोपींकडून २ लाख २७ हजार रुपयांचे १४...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कौशल्यपूर्ण तपास करून एका गुन्ह्यात महत्त्वाची कामगिरी केली आहे. मुंढवा...

error: Content is protected !!