२५ लाख रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल (ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप व सौर पंप) हस्तगत
वालचंदनगर (दि. ४ ऑगस्ट २०२६):
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे शेतीविषयक साहित्य जसे की सौर मोटार पंप, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पिकअप वाहन, मोटार पंप केबल वायर तसेच इतर प्रकारच्या साहित्याच्या चोरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या गंभीर प्रकारची दखल घेत मा. श्री. संदीपसिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. श्री. गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग) आणि मा. श्री. चैतन्य कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग) यांनी चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि दाखल गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या व आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन केले होते.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तपास पथकातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास करत असताना पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड व पोलीस शिपाई गणेश वानकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की,
जयदीप नानासो घोळवे
आणि त्याचे इतर दोन साथीदार
लाकडी, शिंदेवाडी व भवानीनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर व ट्रॉलींची चोरी करत आहेत.
३ सराईत आरोपी अटकेत
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून १) जयदीप नानासो घोळवे (वय २२ वर्षे) व २) मेघराज नानासो ओंबासे (वय २२ वर्षे, दोघेही रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना भवानीनगर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणून कसून चौकशी केली असता, त्यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची ट्रॉली, चार चाकी पिकअप वाहन आणि मोटार पंप यांसारख्या वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा आम्ही दोघे व आमचा तिसरा साथीदार ३) आकाश विलास शिंदे (वय २३ वर्षे, रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे तिघेजण मिळून केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता खालीलप्रमाणे ३ गुन्हे अधिकृतपणे उघडकीस आले आहेत (चार चाकी पिकअप चोरीबाबत अभिलेखाची माहिती तपासली जात आहे):
१. गु.रजि.नं. २२५/२०२६ – भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)
२. गु.रजि.नं. ०५/२०२६ – भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)
३. गु.रजि.नं. ८१/२०२६ – भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)
२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून चोरीचा एकूण २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये:
एक न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर
एक चार चाकी ट्रॉली
एक महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन
एक सौर मोटार सौरपंप
ट्रॉली चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर
सदर जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल संबंधित फिर्यादी व शेतकऱ्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत देण्याची कार्यवाही सुरू आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
सदर यशस्वी धडक कारवाई मा. श्री. संदीपसिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. श्री. गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग), आणि मा. श्री. चैतन्य कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल मानेर, अजित भाग्यवंत, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर, राहुल माने यांनी पार पाडली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे ग्रामीण व उपविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
राजकुमार डुणगे
सहायक पोलीस निरीक्षक
वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























