पुणे:-
पुणे शहरातील शेकडो अनधिकृत होर्डिंग्जचा विषय पुणे महानगरपालिकेसाठी तापदायक ठरत असतानाच, प्रशासनाकडून काही ठराविक प्रकरणांमध्ये कारवाईबाबत जाणीवपूर्वक मौन धारण करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. टिळक रोडवरील एस. पी. कॉलेजच्या आवारात उभे असलेले ७ होर्डिंग्ज पूर्णपणे अनधिकृत असून, यासंदर्भात २१ मे २०२६ रोजी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती.
प्राप्त माहितीनुसार, यांतील ५ होर्डिंग्जबाबत संबंधित मालक कंपनी आणि शिक्षण प्रसारक मंडळींनी नोटराईज्ड करार (Notarized Agreement) करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांच्याकडून शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेस दिनांक १ जुलै २०२६ आणि त्यानंतर पुन्हा ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अशा दोन वेळा कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
शासकीय फसवणुकीचे गंभीर प्रकरण:
याच शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या आवारातील आणखी २ अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईसाठी १९ मे २०२६ रोजी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस सागर धाडवे यांनी पहिली तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात होर्डिंगधारक आणि शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेने पुणे महानगरपालिका तसेच महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. माहिती अधिकारांतर्गत (RTI) मिळालेल्या कागदपत्रांनुसार, संबंधित होर्डिंगधारक व्यावसायिक आणि शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेमध्ये कोणताही वैध भाडेकरार झालेलाच नाही, हे स्पष्ट झाले आहे.
आकाशचिन्ह विभागाची संदिग्ध भूमिका:
या सर्व गंभीर प्रकरणांविषयी पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वारंवार तक्रार करूनही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, आजदेखील या अनधिकृत जाहिरात फलकांवरून अनधिकृतपणे लाखो रुपयांची कमाई चालूच आहे. कायदेशीर पुरावे आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसा असतानाही आकाशचिन्ह विभाग कारवाईबाबत एवढी दिरंगाई का करत आहे? असा संतप्त सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.
आंदोलनाचा इशारा:
अनधिकृतपणे शासनाची फसवणूक करून आणि या दोन्ही प्रकरणांत धर्मादाय आयुक्त कार्यालयाचीही फसवणूक झालेली असताना, पुराव्यासहित वारंवार तक्रारी देऊनही जर कारवाई होणार नाही, तर पुणे महानगरपालिकेच्या बाहेर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तक्रारदार तथा युवक काँग्रेस पुणे शहरचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी दिला आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























