Homeताज्या बातम्याआंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: ३ गावठी अग्निशस्त्र व १ जिवंत काडतूसह...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: ३ गावठी अग्निशस्त्र व १ जिवंत काडतूसह तीन आरोपी जेरबंद

घटनेची पार्श्वभूमी व कारवाई
​दिनांक १०/०८/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे व सुभाष मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जांभुळवाडी पाझरतलावाच्या शेजारी मोकळ्या जागेत (जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) तीन इसम थांबले असून त्यांच्याजवळ अग्निशस्त्र आहे.
​प्राप्त बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार आंबेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी आपल्या पथकासह नमूद ठिकाणी सापळा रचला. या कारवाईत तीन संशयित इसमांना शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले.
​ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
​१) राजन विनोद शहा (वय २३ वर्षे, रा. पोकळे क्रिस्टल सोसायटी, काळभैरवनाथ मंदिरासमोर, धायरीगाव, पुणे)
२) अनिल कैलास चौधरी (वय २६ वर्षे, रा. संदेश रेसिडन्सी, धायरीगाव, पुणे)
३) प्रथम अरूण रेणुसे (वय २४ वर्षे, रा. जाधव हाईटस, भैरवनाथ मंदिराच्यामागे, नाईक आळी, धायरीगाव, पुणे)
​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व गुन्हा दाखल
​पकडण्यात आलेल्या आरोपींकडून अंदाजे १,२०,५००/- रुपये किमतीचे ०३ गावठी अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
​आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३४१/२०२६, आर्म ॲक्ट कलम्स ३(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
​मार्गदर्शन व सहभागी पोलीस पथक
​सदरची ही यशस्वी कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार पार पाडण्यात आली:
​मार्गदर्शन: अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२, पुणे शहर) श्री. मिलींद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) श्री. राहुल आवारे.
​सूचना व नियंत्रण: वरिष्ठ पोलीस निरीक्षक (आंबेगाव पोलीस स्टेशन) श्री. शरद झिने आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चांगदेव सजगणे.
​प्रत्यक्ष कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार: सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, आकाश फासगे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, शिवाजी पोटोळे, योगेश जगदाळे, राकेश टेकावडे, फिरोज शेख.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!