घटनेची पार्श्वभूमी व कारवाई
दिनांक १०/०८/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे व सुभाष मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जांभुळवाडी पाझरतलावाच्या शेजारी मोकळ्या जागेत (जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) तीन इसम थांबले असून त्यांच्याजवळ अग्निशस्त्र आहे.
प्राप्त बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार आंबेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी आपल्या पथकासह नमूद ठिकाणी सापळा रचला. या कारवाईत तीन संशयित इसमांना शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
१) राजन विनोद शहा (वय २३ वर्षे, रा. पोकळे क्रिस्टल सोसायटी, काळभैरवनाथ मंदिरासमोर, धायरीगाव, पुणे)
२) अनिल कैलास चौधरी (वय २६ वर्षे, रा. संदेश रेसिडन्सी, धायरीगाव, पुणे)
३) प्रथम अरूण रेणुसे (वय २४ वर्षे, रा. जाधव हाईटस, भैरवनाथ मंदिराच्यामागे, नाईक आळी, धायरीगाव, पुणे)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व गुन्हा दाखल
पकडण्यात आलेल्या आरोपींकडून अंदाजे १,२०,५००/- रुपये किमतीचे ०३ गावठी अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३४१/२०२६, आर्म ॲक्ट कलम्स ३(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
मार्गदर्शन व सहभागी पोलीस पथक
सदरची ही यशस्वी कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार पार पाडण्यात आली:
मार्गदर्शन: अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२, पुणे शहर) श्री. मिलींद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) श्री. राहुल आवारे.
सूचना व नियंत्रण: वरिष्ठ पोलीस निरीक्षक (आंबेगाव पोलीस स्टेशन) श्री. शरद झिने आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चांगदेव सजगणे.
प्रत्यक्ष कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार: सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, आकाश फासगे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, शिवाजी पोटोळे, योगेश जगदाळे, राकेश टेकावडे, फिरोज शेख.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























