पुणे:
डिजीटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी रोहन रामेश्वर जाधव याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या अटकेमुळे या आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय टोळीच्या अनेक कारवायांची माहिती समोर आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि.नं. १४/२०२६ नुसार, दिनांक २३ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही मोठी फसवणूक घडली. फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात आरोपींनी फोन करून, त्यांच्या आधार कार्डद्वारे कॅनरा बँकेत बनावट खाते उघडल्याचे आणि ते खाते नरेश गोयल यांच्यावरील गुन्ह्यात सापडल्याचे सांगून घाबरवले. “तुमच्या खात्यावर २४ जणांच्या फसवणुकीच्या तक्रारी आहेत, त्यामुळे तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अटक होईल,” अशी भीती दाखवून त्यांना ‘डिजीटल अरेस्ट’ अंतर्गत ठेवले. फिर्यादींना यातून सुरक्षित बाहेर काढण्याचे आमिष दाखवून, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या भामट्यांनी त्यांची सर्व गुंतवणूक वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाली.
तपासात काय निष्पन्न झाले?
फिर्यादीने ३० जानेवारी २०२६ रोजी एका बँक खात्यावर ७५ लाख रुपये भरले होते. तेथून हे पैसे बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन वेगवेगळ्या खात्यांत वळवण्यात आले होते. सायबर क्राईम पोर्टल व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी यापूर्वी हर्षद सुभाष धनतोले, समर्थ सुरेश देशमुख (दोघे रा. कर्वेनगर) आणि अमर अत्तरगी (रा. सोलापूर) यांना अटक केली होती. त्यानंतर दिल्लीतील प्रणव करणसिंग आर्या याचेही नाव तपासात समोर आले.
मुख्य सूत्रधार रोहन जाधवच्या मुसक्या आवळल्या
तपासादरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य साथीदार रोहन रामेश्वर जाधव (वय २६) हा फरार असल्याचे निष्पन्न झाले होते. हा आरोपी मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून, सन २०२२ पासून तो पिंपळे निलख येथे वास्तव्यास होता. विशेष म्हणजे, तो इन्स्टाग्रामवर ‘रोहन जाधव’ नावाने रिलस्टार म्हणून काम करत होता. त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँगमधील संशयितांशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले होते. त्याच्यावर न्यायालयाने ‘नॉन बेलेबल वॉरंट’ जारी केले होते. अखेर सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याला पिंपळे गुरव परिसरातील सूर्य अपार्टमेंटमधून अटक केली.
मोठा आर्थिक आकडा समोर
या गुन्ह्यात आत्तापर्यंत पोलिसांनी १ कोटी ३४ लाख रुपये गोठवण्यात यश मिळवले आहे. फसवणुकीची रक्कम तब्बल ५,४३६ बँकांमध्ये ट्रान्सफर झाल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह-पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते आणि पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर) श्री. विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागरिकांना आवाहन
स्वतःला सीबीआय, ईडी किंवा पोलीस असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल किंवा फोनद्वारे धमकावून पैसे मागितल्यास घाबरू नका. अशा प्रकारच्या फसवणुकीची तक्रार तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर नोंदवावी, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























