Homeताज्या बातम्याउरळी कांचन–शिंदवणे गौणखनिज प्रकरण गंभीर खोटा पंचनामा, अधिकारी संगनमताचा आरोप; पत्रकारांवर मारहाण,...

उरळी कांचन–शिंदवणे गौणखनिज प्रकरण गंभीर खोटा पंचनामा, अधिकारी संगनमताचा आरोप; पत्रकारांवर मारहाण, जीवितास धोका

उरळी कांचन–शिंदवणे गौणखनिज प्रकरण गंभीर
खोटा पंचनामा, अधिकारी संगनमताचा आरोप; पत्रकारांवर मारहाण, जीवितास धोका

पुणे | प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील उरळी कांचन–शिंदवणे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणी वारंवार तक्रारी होऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिस्थिती चिघळली असून, थेट पत्रकारांवर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
या प्रकरणात मंडळ अधिकारी माधुरी बगळे आणि शिंदवणे येथील तलाठी ढगे यांच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. तक्रारदार पत्रकार तथा माहिती अधिकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात गैर अर्जदारांच्या संगनमताने खोटा पंचनामा केल्याचा संशय आहे. तसेच कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेण्याचा प्रयत्न झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
कॉल करून बोलावले; नंतर संरक्षण नाकारले
आज दिनांकास 5/1/2026 दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास मंडळ अधिकारी माधुरी बगळे यांच्या सांगण्यावरून घटनास्थळी येण्याबाबत फोनद्वारे संपर्क करण्यात आला. “या, गरज आहे” असे सांगण्यात आले. या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.
मात्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर “तुम्ही आलात तरी काही होणार नाही” असे सांगण्यात आले आणि काही वेळातच दमदाटीची परिस्थिती निर्माण होऊन पत्रकार अमीर शेख व सहकारी पत्रकार सोमनाथ खंडागळे यांना मारहाण करण्यात आली.
मारहाणीची माहिती देऊनही पोलीस संरक्षण नाही
विशेष म्हणजे, मारहाण सुरू असतानाच ही बाब मंडळ अधिकारी माधुरी बगळे यांना तात्काळ कळविण्यात आली, मात्र त्यांच्या स्तरावरून पोलीस स्टेशनला कळवून संरक्षण देण्यात आले नाही, असा गंभीर आरोप आहे. उलट संबंधित गैर अर्जदारांना अप्रत्यक्ष मदत मिळाल्याची परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे पत्रकारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आधीही ई-मेल तक्रार; तरीही दुर्लक्ष
या बेकायदेशीर उत्खनन प्रकरणाबाबत यापूर्वीही ई-मेलद्वारे तक्रार दिलेली असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या दुर्लक्षामुळेच पुढे जाऊन हिंसक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकशी व कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणात —
बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन
खोटा पंचनामा
प्रशासनिक दुर्लक्ष
पत्रकारांवर शारीरिक हल्ला व सुरक्षा नाकारणे
या सर्व बाबी अत्यंत गंभीर व फौजदारी स्वरूपाच्या असल्याचे सांगत, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास लोकायुक्त, मानवाधिकार आयोग व न्यायालयीन मार्गाने लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

खडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र निषेध; शांतता,...

खडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र निषेध; शांतता, बंधुभाव आणि कायद्याच्या राज्याचे पालन करण्याचे आवाहन पुणे, दि. २२ जून...

पुणे महापालिकेत विरोधी नगरसेवकांनी हेल्मेट परिधान करून भाजपची धमकी दिली आहे. पुणे बातम्या

विरोधी नगरसेवक सभागृहात हेल्मेट घालतात पुणे: भाजप सदस्यांच्या “आक्रमक आणि धमकावणाऱ्या” वागणुकीला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) च्या विरोधी नगरसेवकांनी बांधकाम...

error: Content is protected !!