Homeताज्या बातम्याएमपीडीएमध्ये स्थानबद्धतेतून सुटलेला व तडीपार आरोपी वाहन चोरीच्या गुन्ह्यात जेरबंद; खडक पोलिसांची...

एमपीडीएमध्ये स्थानबद्धतेतून सुटलेला व तडीपार आरोपी वाहन चोरीच्या गुन्ह्यात जेरबंद; खडक पोलिसांची धडक कारवाई

​पुणे:
खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत पोलिसांनी एका सराईत व तडीपार आरोपीला आणि त्याच्या पत्नीला जेरबंद केले आहे. एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेतून सुटलेला हा आरोपी सध्या हद्दपार असतानाही शहरात वावरत असल्याचे उघडकीस आले आहे.
​गुन्ह्याची पार्श्वभूमी:
​दिनांक २२/०९/२०२६ रोजी फिर्यादी यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिली होती की, दिनांक २१/०९/२०२६ रोजी रात्री १९:५० वाजेच्या सुमारास किराड आळी, भवानी पेठ, पुणे येथील रोडच्या लगत लॉक करून पार्क केलेली अॅक्टिव्हा दुचाकी अज्ञात इसमाने चोरी केली आहे. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ५२३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास खडक पोलीस स्टेशनकडील तपास पथकाद्वारे गांभीर्याने सुरू होता.
​तांत्रिक तपास व आरोपीची माहिती:
​गुन्ह्याच्या तपासादरम्यान प्राप्त माहिती, आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असताना, सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे व पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी वसीम सलिम पटेल (वय ४२ वर्षे, रा. कोंढवा, पुणे) याने केला आहे.
​ही माहिती मिळताच खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोंढवा येथील रेकॉर्डवरील आरोपीच्या राहत्या पत्त्यावर जाऊन शोध घेतला असता तो तिथेच मिळून आला. त्यास दिनांक २३/०९/२०२६ रोजी १७:१० वाजता ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, सदरचा गुन्हा तो व त्याची पत्नी यांनी मिळून केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेली ७०,०००/- रुपये किंमतीची काळ्या रंगाची अॅक्टिव्हा मोपेड दुचाकी हस्तगत करून जप्त करण्यात आली आहे. तपासात हा गुन्हा पती-पत्नीने मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
​आरोपीचा गुन्हेगारी इतिहास:
​नमुद आरोपीविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. त्यास कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे येथून सन २०२५ मध्ये पुणे आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून हद्दपार करण्यात आले होते. त्याचा हद्दपार काळ अद्याप सुरू असून त्याबाबतचा तपास चालू आहे.
​मार्गदर्शन व तपासात सहभागी पथक:
​सदरची ही उत्कृष्ट कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पार पाडली:
​मार्गदर्शक:
​मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग – श्री. राजेश बनसोडे
​मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ – श्री. ऋषिकेश रावले (कृषिकेश रावले)
​मा. सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग – श्री. सचिन हिरे
​तपास पथक अधिकारी व अंमलदार:
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक – श्री. धनंजय पिंगळे
​पोलीस निरीक्षक (गुन्हे) – श्रीमती शर्मिला सुतार व श्री. समाधान पवार
​सहायक पोलीस निरीक्षक – प्रसन्न जऱ्हाड
​पोलीस उपनिरीक्षक – महेंद्र कांबळे, राहुल मखरे
​सहायक पोलीस उपनिरीक्षक – विनोद शिंदे
​पोलीस अंमलदार – मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, उमीश मठपती, सैपुनमुलुख नदाफ, विकास पांडोळे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बनावट खाती (म्युअल अकाऊंट) उघडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५...

​पुणे: महाराष्ट्र सायबर मुंबई यांचेकडून मनी ट्रेल, म्युअल बँक अकाऊंट तसेच चेक एटीएम विड्रालच्या फसवणुकीच्या तक्रारींची डेटा माहिती प्राप्त झाल्यामुळे, वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

. दुःखाच्या प्रसंगी धावली ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’; मोशीतील मृत महिलेचे संपूर्ण हॉस्पिटल बिल...

पुणे/पिंपरी-चिंचवड: मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मयत झालेल्या प्रतिभा बळीराम बोतकूलवार यांच्या कुटुंबीयांना 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'च्या तत्पर मध्यस्थीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने...

लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक २७च्या वतीने अभिवादन

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक २७च्या वतीने त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात...

वानवडीत रिक्षाला धडक देऊन अल्पवयीन शाळकरी मुलींसह रिक्षाचालकाला जखमी करणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॉन्ग साईडने भरधाव वेगात येऊन शाळकरी मुलींच्या रिक्षाला धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या...

error: Content is protected !!