Homeताज्या बातम्याकुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

सविस्तर बातमी:
​पुणे:
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे.
​दिनांक २३/०७/२०२६ ते दिनांक २६/०७/२०२६ या कालावधीत गुजरवाडी कात्रज व शिवाजीनगर परिसरात टोळी प्रमुख आरोपी सुरज ठोंबरे व त्याच्या gang मधील इतर सदस्यांनी आंदेकर गँगच्या सदस्यांसोबत (आयुष कोमकर, गणेश काळे व इतर) फौजदारी कट रचला होता. दिनांक २६/०७/२०२६ रोजी केलेल्या हत्येचा बदला व अक्षय म्हर्केच्या खुनाच्या प्रयत्नाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगमधील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर व तुषार वाडकर यांना शिवाजीनगर कोर्टमध्ये आणले असता, त्यांना शिवाजीनगर कोर्ट येथून पोलीस गाडीमधून धुळे व नंदुरबार येथे घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता.
​आग्नेयस्त्र बाळगून शिवाजीनगर कोर्टापासून ते कुरोळी चाकण पर्यंत रेकी करून, सुरज ठोंबरे याने वेळोवेळी आंदेकर व वाडकर यांच्या वाहन ताफ्यांची माहिती दिली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
​अटक व पाहिजे आरोपींची नावे:
​तपासा दरम्यान खालील आरोपी निष्पन्न झाले आहेत:
​अटक आरोपी १: वेदांत रोहित सावंत (वय २१ वर्षे, रा. वनराई कॉलनी, केशवगर नगर, प्रियदर्शन मराठी स्कुल शेजारी, धनकवडी, पुणे).
​अटक आरोपी २: अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१ वर्षे, रा. अरुणप्लाजा फ्लॅट नंबर ४०६, गुजरवाडी कात्रज, पुणे, मूळ गाव मु.पो. नाझरे, ता. भोर, जि. पुणे).
​अटक आरोपी ३: धिरज लखारा (रा. धनकवडी, पुणे).
​पाहिजे आरोपी ४: सुरज अशोक ठोंबरे (वय २४ वर्षे, रा. नानापेठ, पुणे).
​पाहिजे आरोपी ५: मानव शरद ढमाले (वय २४ वर्षे, रा. सावरकर चौक, धनकवडी, पुणे).
​पोलीस अधिकारी व मार्गदर्शन:
​सदर प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी मा.पो.उप-आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, श्री. मिलिंद मोहिते यांचे मार्फ़तीने मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांना मकोका लावण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मंजुरी दि. २६/०८/२०२६ रोजी राहुल आवारे, सहायक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांनी दिली आहे.
​ही उल्लेखनीय कामगिरी खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे:
​श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर)
​मा. संजय दराडे (पोलीस सह आयुक्त, पुणे शहर)
​श्रीमती. तेजस्विनी सातपुते (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर)
​श्री. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर)
​श्री. मिलिंद मोहिते (पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर)
​मा. राहुल आवारे (सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग)
​तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष जाधव, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, आणि पोलीस अंमलदार विशाल वारुळे, श्रीकांत कुलकर्णी, स्वप्नील बांदल, सचिन सरपाले यांनी ही कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

error: Content is protected !!