Homeताज्या बातम्याखराडी पोलिसांची मोठी कारवाई : ५ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद, चार गुन्ह्यांचा...

खराडी पोलिसांची मोठी कारवाई : ५ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद, चार गुन्ह्यांचा उलगडा

पुणे, दि. २८ एप्रिल २०२६ : खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला पोलिसांनी जाळ्यात अडकवत मोठी कारवाई केली आहे. या आरोपीकडून चोरी, जबरी चोरी आणि वाहन चोरीसह एकूण चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १८८/२०१९ भा.दं.वि. कलम ३९५, ३९६, ३४६, ३२३, ५०६, २०१ आणि आर्म अॅक्ट कलम ४(२५) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील एक आरोपी म्हणून तेजस अमृत ठेरे याचा शोध सुरू होता. आरोपीने फिर्यादीचा मोबाईल, रोकड रक्कम, सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट, दुचाकी व चारचाकी वाहन असा सुमारे ३,८५,००० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची तक्रार दाखल होती.
तसेच या गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी फिर्यादीच्या मित्र राहुल शिवाजी आंब्रे (रा. वाघोली), राज तानाजी जाधव (रा. वडगाव शेरी) यांना मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली होती. यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांची दोन्ही मृतदेहे नदीपात्रात फेकून दिल्याचे समोर आले. त्यामुळे या गुन्ह्यात भा.दं.वि. कलम ३६४, २०१ अन्वयेही कलमे वाढविण्यात आली होती.
या प्रकरणातील बहुतांश आरोपींना चंदननगर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी तेजस अमृत ठेरे हा गुन्हा घडल्यापासून पसार होता. न्यायालयाने त्याच्याविरोधात वारंट जारी केले होते. �

फरार आरोपीविरोधात खालील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे :
खडक पोलीस ठाणे, पुणे शहर – गु.र. नं. ६६/२०१५, भा.दं.वि. कलम ३०७, १२०(ब), १४३, १४७, १४८, १४९ तसेच आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायदा कलमे.
शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण – गु.र. नं. ६१/२०१५, भा.दं.वि. कलम ४२०, ४२१, ३४.
मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर – गु.र. नं. २०३/२०१५, आर्म अॅक्ट कलम ४, २५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५.
चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर – गु.र. नं. १८८/२०१९. �
Kharadi P.St Press Note & Image Dt 28.04.2026_1.pdf
दि. २५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास खराडी पोलीस स्टेशनचे राजगड पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपे व अशोक केदार हे स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की फरार आरोपी तेजस अमृत ठेरे हा खराडी परिसरात फिरत आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचत उबाळे नगर, खराडी येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे ५ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर जेरबंद झाला असून, पुणे पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसरमध्ये बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून थकित कर्जदाराला मारहाण; तिघांना अटक

हडपसरमध्ये बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून थकित कर्जदाराला मारहाण; तिघांना अटक पुणे, दि. २८ एप्रिल २०२६ : हडपसर येथे इंडसइंड बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी थकित क्रेडिट कार्ड कर्जदाराकडे कर्जापेक्षा...

मोबाईल चोरीच्या गुन्हेगारास ०४ तासात पकडून ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तत्पर कारवाई करत मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या ०४ तासांच्या आत ताब्यात घेत ६६ हजार रुपयांचा...

सेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा राज्यस्तरीय सन्मान

पुणे, दि. 28 एप्रिल: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध...

मराठी न येणाऱ्या चालकांचे लायसन्स रद्द? पँजतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनीफ...

मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द करण्याच्या कथित निर्णयाविरोधात निवेदन; मुख्यमंत्री व पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पँजतन पवित्र संघटनेची तक्रार पुणे, दि. 28 एप्रिल: मराठी...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास | पुणे बातम्या

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

error: Content is protected !!