१०० टक्के निकालासाठी विद्यार्थ्यांना पुरवल्या कॉपी
पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक ; २१ फेब्रुवारी २०२६ : दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट. पण पुण्यातील धायरीत शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवून शिक्षण व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगलेत. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून धायरीत ‘कॉपी बहाद्दर’ शिक्षकांनी नेमके काय कारनामे केले जाणून घ्या.
आठवड्याभरापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्येही शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना क़ॉपी पुरवल्याचा प्रकार घडला होता. मात्र यावेळी परिक्षा केंद्रावरील पर्यावेक्षकांलाच चिरीमिरी देत चहापानाला पाठवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी क़ॉपीचं पान मांडून ठेवलंय. त्यामुळे याप्रकरणात शिक्षकावर कारवाई करण्याचे निर्देश बोर्डाच्या विभागीय अध्यक्षांनी दिलेत.
गेल्या काही वर्षांपासून परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून विभागीय आणि राज्य मंडळ प्रयत्नशील आहे. कॉपी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही लावलेले असले तरीही परीक्षार्थी, शाळेच्या केंद्रावरील केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनाच धाक उरलेला नसल्याचं दिसतयं. आता तर विदयार्थी नव्हे तर शिक्षकचं कॉपी बहाद्दर बनत चालले आहे.
क़ॉपीच्या प्रकरणामुळे दरवर्षी विद्यार्थी आणि शिक्षकांवर कारवाई होत असली, कारवाईचे निर्देश दिले जात असले तरी कॉपीची प्रकरण थांबवण्याचं नाव नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच कॉपी पुरवणाऱ्या शिक्षकांना थेट बडतर्फ करायला हवं. तरच शिक्षण व्यवस्थेला लागलेली कॉपीची वाळवी दूर होईल.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























