नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या शुभ असते “दिव्यांग निर्णय “दिनदर्शिका चे प्रकाशन
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.
दिव्यांगांचे दैवत मा.श्री.बच्छुभाऊ कडु यांच्या प्रेरणेतून राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग दिनदर्शिका सन 2026 चे प्रकाशन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे योगा केंद्र राहुरी या ठिकाणी राहुरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा.श्री. भाऊसाहेब मोरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी आपल्या शहरातील दिव्यांग बांधवासाठी स्वातंत्र दिव्यांग भवन असावे , अशी मागणी व्यक्त केली. संस्थेच्या दिव्यांग बांधवांसाठी संस्थेचा उद्देश संस्थेचे उपक्रम याबद्दल माहिती सांगितली त्यावर नगराध्यक्ष मोरे सर यांनी आपल्या भाषणामध्ये दिव्यांगां च्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन येथे पाच वर्षात दिव्यांगासाठी दिव्यांग भवन साठी पाठपुरावा करून बांधून देण्यात येईल अशी ग्वाही दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश लबडे तालुकाध्यक्ष राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांनी केले.अध्यक्षस्थानी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे मार्गदर्शक श्री.दादासाहेब मोरे सर ,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर घाडगे प्रमुख पाहुणे श्री.भाऊसाहेब मोरे सर श्री.गोसावी सर श्री.गुलदगड सर तसेच श्री.छबुराव मोरे काका प्रहार दिव्यांग संघटनेचेजिल्हा सल्लागार सलीम भाई शेख , यादी मान्यवरांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला.तसेच अध्यक्षीय भाषणात श्री. दादासाहेब मोरे यांनी दिव्यांगांप्रती समस्या करावयाचे उपाय योजना सुविधा उपक्रम यांवर मार्गदर्शन केले. आपल्या राहुरी शहरात 400 हून अधिक दिव्यांग बांधव आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून दिव्यांग शक्ती सेवा संस्था कार्यरत आहे येत्या पाच वर्षात नगरपालिकेत आपल्या व्यथा मांडण्यासाठी स्वीकृत नगरसेवक असावा अशी विनंती वजा मागणी केली .आभार श्री.रविंद्र भुजाडी सचिव राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांनी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर तथा सर्व राहुरी तालुका दिव्यांग बंधू भगिनी सर्व जिल्हा/तालुका/शाखा पदाधिकारी सहकारी यांचे गोडशब्दात आभार मानले.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























