पार्थ अजित पवारांच्या १८०४ कोटींच्या जमीन व्यवहारावर शिवसेनेचा संताप – पुण्यात एस.पी. कॉलेज चौकात आक्रमक आंदोलन
पुणे –
मुंढवा परिसरातील तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेण्यात आली असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर करण्यात येत आहे. या संशयास्पद आणि गैरव्यवहारिक जमीन खरेदी-विक्री प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे शहराच्या वतीने एस.पी. कॉलेज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या नेत्यांनी आरोप केला की, “अमेडा कंपनीचे भांडवल केवळ एक लाख रुपये असूनही या कंपनीने ३०० कोटी रुपयांची जमीन विकत घेतली, हा प्रकार सत्तेचा उघड गैरवापर असून आर्थिक गैरव्यवहाराचे उदाहरण आहे.”
तसेच, या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचे उघड झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी “भ्रष्टाचार करणाऱ्यांना अटक करा”, “जनतेच्या जमिनींची लूट थांबवा” अशा घोषणा देत सरकारवर जोरदार निशाणा साधला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “ही जनतेच्या जमिनींची लूट असून तपास यंत्रणांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देईल.”
आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे,
गजानन थरकूडे,
उपशहरप्रमुख आबा निकम, प्रशांत राणे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत,
संघटक राजेंद्र शिंदे, पराग थोरात,
वाहतूक सेनेचे दत्तात्रय घुले,
विभाग प्रमुख सूरज लोखंडे, नितीन परदेशी, मुकुंद चव्हाण, विलास सोनवणे, गोविंद निंबाळकर, नंद येवले, संदीप गायकवाड, नितीन रावळेकर, संजय गवळी, दिलीप पोमण, मकरंद पेठकर, गणेश घोलप, सूर्यकांत पवार, नितीन दलभजन, नीलेश वाघमारे, हेमंत यादव, नागेश खडके, नितीन थोपटे, नितीन निगडे, राहुल शेडगे, नंदू साबळे, नितीन आल्हाट, नीलेश पवार, गौरव सिन्नरकर, अर्जुन जानगवळी, द्न्यानंद कोंढरे, परेश खांडके, नीरज नांगरे, पुरुषोत्तम विटेकर, गिरीश गायकवाड, सोहम जाधव, वैभव कदम, अनिल वांजळे, दिलीप व्यवहारे, दाजी गुजर, संजय वाल्हेकर, गणेश औरंगाबादकर, अभिषेक जगताप, झुबेर शेख, नीलेश चव्हाण, अतुल कवडे, श्रीनिवास कराड, आबा लोखंडे, राजेश राऊत, संजय लोहार, रमाकांत शस्ते, कैफ शेख, संजय साळवी, पाला मोरे, संतोष चव्हाण, विजय पालवे आदींनी सहभाग घेतला.
महिला आघाडीच्या निकिता मारटकर, वैशाली दारवटकर, सुलभा तळेकर, रेखा कोंडे, स्वाती कथलकर, ज्योती वीर, करूना घाडगे, रोहिणी कोल्हाळ, जयश्री भनगे, विजया मोहिते, स्नेहल पाटोळे या महिला पदाधिकाऱ्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कळावे
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























