‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात अंमली पदार्थ तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजन कुमार शर्मा व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर यांच्या पथकाने शिरूर परिसरात सलग दोन दिवस एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत धडक कारवाया केल्या आहेत.
१८ ऑगस्टची पहिली कारवाई
दिनांक १८/०८/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून ११० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एम.डी. अंमली पदार्थ आणि एक मोटारसायकल असा एकूण २२,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७४४/२०२६, एनडीपीएस कायदा कलम ८ (क) व २२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
दुसऱ्या कारवाईचा तपशील (१९-२० ऑगस्ट)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संजू जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, दोन इसम स्कॉर्पिओ गाडी (क्र. MH 16 BM 7999) मधून एम.डी. अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन शिरूर परिसरात येणार आहेत.
त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग यांच्या आदेशानुसार कायदेशीर बाबींची पूर्तता करून स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने पंचांसह सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
दादा बबन धावडे (वय २७ वर्षे, रा. कोल्हेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)
अमोल राजाराम पोटावळे (वय ३५ वर्षे, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)
जप्त मुद्देमाल व दाखल गुन्हा
आरोपींच्या ताब्यातून २० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एम.डी. अंमली पदार्थ व गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार असा एकूण ९,१०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७५०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २१ (ब), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांचे आवाहन
जिल्ह्यातील युवा पिढीला अमली पदार्थांच्या घातक व्यसनापासून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. हे अवैध जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी नागरिकांनी परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. नागरिकांनी निर्भयपणे पुढाकार घेऊन अमली पदार्थमुक्त समाज घडवण्यात योगदान द्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
कारवाईतील पोलीस अधिकारी व अंमलदार
सदरची कामगिरी खालील वरिष्ठ अधिकारी व पोलीस पथकाने पार पाडली:
मार्गदर्शन: पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (पुणे विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र भासले (शिरूर उपविभाग).
अधिकारी: पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक विनोद पाटील (शिरूर पोलीस स्टेशन), सपोनि नितीन केनेकर, पोसई महेश डोंगरे (स्थानिक गुन्हे शाखा).
स्थानिक गुन्हे शाखा अंमलदार: संजय पड्याळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ.
शिरूर पोलीस स्टेशन अंमलदार: बाळु भवर, काळे, रुद्रे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























