Homeताज्या बातम्यापुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कारवाई: सराईत गुन्हेगारांकडून एक...

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ ची धडक कारवाई: सराईत गुन्हेगारांकडून एक अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे जप्त

​पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट २ ने शहरात शरिराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या विशेष मोहिमेत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४०,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०७/०८/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व महेश मंडलिक यांना गोपनीय बातमी मिळाली की, आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दरी पुलाखाली काही इसम संशयितरित्या अग्निशस्त्रासह थांबले आहेत. ही माहिती गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी तातडीने कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.
​पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) राजेंद्र ऊर्फ राजा शिवाजी तावरे (वय ४३, रा. रांजे, ता. भोर, जि. पुणे)
२) संजय आण्णा जाधव (वय १९, रा. खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे)
३) प्रतिक ऊर्फ सोन्या बाळासाहेब तावरे (वय २५, रा. रांजे, ता. भोर, जि. पुणे)
​हे तिघेही विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी हे अग्निशस्त्र आपल्या एका साथीदाराकडून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे.
​ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उप-निरीक्षक तेजश्री पवार, पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्यासह शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, उज्वल मोकाशी, नागनाथ राख, कुंदन शिंदे, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, सर्जेराव सरगर, संदीप शिर्के, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, आशिष यादव, शंकर कुंभार, योगेश मांढरे, विनायक वगारे व रोहन खैरे या पोलीस पथकाचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!