पुणे (प्रतिनिधी):
स्वतःला ‘ईश्वर’ असल्याचे भासवून एका महिलेची व तिच्या कुटुंबाची फसवणूक करणे, अमानुष छळ करणे आणि महिलेवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खराडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या ७ सहकाऱ्यांना (एकूण ८ जणांना) अटक केली आहे. त्यांच्याकडून २५ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दीर्घकाळापासून सुरू होता छळ
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सन २००१ ते सन २०२६ दरम्यान मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा याने स्वतःला ईश्वर असल्याचे भासवून फिर्यादी महिला व तिच्या कुटुंबाला प्रभावित केले होते. त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्याने कुटुंबाची मानसिक, भावनिक व आर्थिक फसवणूक केली.
पुढे, सन २००९ ते २०२६ या कालावधीत आरोपी राधामोहन मिश्रा याने त्याचे सहकारी स्वामी कंवल नयन, कीर्ती अहुजा, कनिका अहुजा, खुशबू हुडीया, श्वेता मिश्रा, अमृता मिश्रा आणि श्वेता पांडे यांच्या मदतीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ केली. तसेच अमानुष छळ करून तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.
८ आरोपींना अटक; आरोपींची नावे व पत्ता:
माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी छापा टाकून खालील आरोपींना अटक केली आहे:
१) राधामोहन मिश्रा (वय ५९ वर्षे, रा. माऊली सदन, गट नं. १३४४/७, रेणुका पार्क, आरव अॅम्बियस जवळ, उबाळेनगर, खराडी, पुणे)
२) स्वामी कंवल नयन (वय ५८ वर्षे, रा. सदर)
३) कीर्ती हंसराज आहुजा (वय ३८ वर्षे, रा. रेणुका पार्क, माऊली सदन, उबाळेनगर, खराडी, पुणे)
४) कनिका हंसराज आहुजा (वय ३४ वर्षे, रा. घर नं. ३३३, जिंदल सिटी, कुरुक्षेत्र, हरियाणा राज्य)
५) खुशबू गजेंदर हुडीया (वय ३७ वर्षे, रा. रेणुका पार्क, माऊली सदन, उबाळेनगर, खराडी, पुणे)
६) श्वेता अवधबिहारी मिश्रा (वय ३७ वर्षे, रा. रेणुका पार्क, माऊली सदन, उबाळेनगर, खराडी, पुणे)
७) अमृता अवधबिहारी मिश्रा (वय ३२ वर्षे, रा. रेणुका पार्क, माऊली सदन, उबाळेनगर, खराडी, पुणे)
८) श्वेता संजय पांडे (वय २८ वर्षे, रा. माऊली सदन, रेणुका पार्क, आरव अॅम्बियस जवळ, उबाळेनगर, खराडी, पुणे)
अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल
या प्रकरणी खराडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २१०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६१(२), ६४(२)(एम), ६८, ७४, ७५, ७७, १२३, ११५(२), ३५१(२), ३(५) सह ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा व त्याचे समूळ उच्चाटन करणे बाबत अधिनियम’ कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून तिथून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रोकड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण २५,७७,२४०/- रुपये किमतीच्या मुद्देमालामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:
०८ लॅपटॉप
०९ मोबाईल फोन
१९ हार्डडिस्क
२० कॅसेट्स
१० डी.व्ही.डी.
०१ डिव्हीआर (DVR) मशीन
०२ सी.पी.यु. (CPU) मशीन्स
२३ पेनड्राइव्हज्
६,६०,०००/- रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने
पोलीस अधिकारी व तपास
सदर कारवाई पुणे शहराच्या मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०७) श्री. प्रशांत अमृतकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करीत आहेत.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,















