पुणे (प्रतिनिधी):
बिबवेवाडी भागात एका रिक्षाचालकाला अडवून, त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत रिक्षा, मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या ३ अट्टल आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १२/०६/२०२६ रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास (०३:३० वा.) फिर्यादी हे आपल्या रिक्षातून गुरुगौतम मुनी हॉस्पिटल समोरील रस्त्यावरून जात होते. दरम्यान, दोन पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्यांवरून आलेल्या ४ अनोळखी इसमांनी फिर्यादी यांची रिक्षा अडवली. आरोपींनी फिर्यादीला रिक्षामधून जबरदस्तीने बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील ‘विवो’ (Vivo) कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम आणि रिक्षा असा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २०७/२०२६, भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०९ (४), १२६(२), ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम (म.पो.अधि.) कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपींना बेड्या
दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी बिबवेवाडी पोलिसांचे तपास पथक कार्यरत होते. दरम्यान, तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व रक्षित काळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत आरोपींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गंगाधाम रोड, आईमाता मंदिर मागे, बिबवेवाडी येथून ३ आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) किरण एडबा झोंबाडे (वय २० वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मी नगर, पर्वती, पुणे)
२) पंकज सुभाष पवार (वय २१ वर्षे, रा. शाहू वसाहत, अनिता वॉशिंग सेंटर मागे, लक्ष्मी नगर, पर्वती, पुणे)
३) कुमार बाळकृष्ण खुडे (वय ३० वर्षे, रा. जागडे चाळ, गॅस गोडावून जवळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे)
पोलिसांनी या तिघांकडे अधिक तपास केला असता, त्यांनी सदर जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस पथकाची कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहराचे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ २) श्री. मिलींद मोहिते, आणि भारती विद्यापीठ विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री. राहूल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे यांच्या सूचनांनुसार, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस अमंलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, रक्षित काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, राहूल खाडे, ज्योतिष काळे, संतोष बनसुडे, महेश गिरी व दत्ता शेंद्रे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,
















