Homeताज्या बातम्यापुरंदर विमानतळ आंदोलनात रक्तरंजित वळण: पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, महिलेचा मृत्यू

पुरंदर विमानतळ आंदोलनात रक्तरंजित वळण: पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, महिलेचा मृत्यू

पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ
प्रकल्पाविरोधात गेली अनेक वर्षे शांततामय
आंदोलन करणाऱ्या शोतकऱ्यांचा संयम ज्ञनिवारी (३ मे) अखेर
सुटला. प्रशञासनाच्या ड्रोन सर्व्हेमुळे संतप्त झालेल्या
शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा मारा
केला, ज्यात अनेक रोतकरी, महिला जखमी झाले.यामुळे प्रक्षुब्ध शेतकऱ्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगड आणि मातीचे ढेकळे फेकले. आंदोलनादरम्यान कुंभारवळण येथील अंजना महादेव कामथे (वय ५५) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर एखतपूरच्या विमल बाजीराव मोरे जखमी झाल्या. “आमच्या प्रेतांवरूनच विमानतळ होईल,” अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.

शुक्रवारी एखतपूर गावात प्रशासनाने ड्रोन सर्व्हे सुरू केला, पण शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून तो रोखला. सायंकाळी अधिकाऱ्यांनी गनिमी काव्याने सर्व्हे पूर्ण केला. शनिवारी उर्वरित गावांचा सर्व्हे सुरू होताच शेतकऱ्यांनी सासवड-वाघापूर मार्गावर वनपुरी चौकात बैलगाड्या लावून नाकाबंदी केली. प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि डीवायएसपी तानाजी बरडे यांच्या फौजफाट्याला कुंभारवळण येथे शेतकऱ्यांनी रोखले. रस्त्यावर लोखंडी खांब टाकून गाड्या अडवण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी खांब हटवत पुढे सरकण्याचा प्रयत्न केला.

दुपारी ३ वाजता शेतकऱ्यांनी पोलिसांना मज्जाव केल्याने सौम्य लाठीमारानंतर जोरदार लाठीहल्ला झाला. अश्रुधुराच्या नळकांड्यांनी जमाव पांगवला गेला. यात अनेक तरुण, ज्येष्ठ आणि महिला जखमी झाले. पोलिसांनी ८-१० आंदोलकांना ताब्यात घेतल्याने सायंकाळी ५ वाजता शेतकऱ्यांनी सासवड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. “आटक शेतकऱ्यांना सोडा, गुन्हे दाखल करू नका,” अशी मागणी करत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त केला. आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात तणाव आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले | पुणे बातम्या

पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला. पुणे बातम्या

पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

उपग्रह आणि ग्राउंड डेटा वापरून अंदाज अचूकता सुधारण्यासाठी IITM-ISRO टाय-अप | पुणे बातम्या

पुणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटर यांच्यातील सहकार्याचा उद्देश भू-आधारित मोजमापांसह उपग्रह निरीक्षणे एकत्रित करून हवामान अंदाजांची अचूकता...

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन. पुणे बातम्या

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर शनिवारी पुण्यातील शेकडो आंदोलकांनी...

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पुणे...

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

error: Content is protected !!