Homeताज्या बातम्याबिहार भवन निषेधाची फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन … बालगंधर्व येथे ‘शतकवीर बाळकडू’...

बिहार भवन निषेधाची फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन … बालगंधर्व येथे ‘शतकवीर बाळकडू’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन

बिहार भवन निषेधाची फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन …
बालगंधर्व येथे ‘शतकवीर बाळकडू’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन

पुणे :
शिवसेना प्रमुख, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रसिद्धी प्रमुख श्री. अनंत घरत यांच्या आयोजनातून ‘शतकवीर बाळकडू’ या भव्य व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज बालगंधर्व कलादालन येथे उत्साहात पार पडले.

या वेळी बिहार भवन निषेधाची फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना उपनेत्या मा. सुषमा ताई अंधारे व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ मा. असीमजी सरोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, तरुण कार्यकर्ते व कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रदर्शनात प्रसिद्ध व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक, निर्भीड आणि सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या शैलीतील ही व्यंगचित्रे आजच्या राजकीय परिस्थितीवर नेमके भाष्य करणारी आहेत. सत्तेचा दुरुपयोग, राजकीय उलथापालथ, विचारधारांचा विसर, पिसासू सत्ताकांक्षा आणि वैतागलेला मतदार या सर्व विषयांवर ही व्यंगचित्रे बोलकी व संवेदनशील भाष्य करतात.

यावेळी बोलताना मा. सुषमा ताई अंधारे म्हणाल्या,
“ही व्यंगचित्रे म्हणजे आजच्या महाराष्ट्राची आरशासारखी मांडणी आहे. शिवसेना आणि व्यंगचित्रांचा संबंध जन्मापासूनचा आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे सामर्थ्य या व्यंगचित्रांमध्ये आहे.”

आयोजक श्री. अनंत घरत म्हणाले,
“देश व राज्यातील सद्य परिस्थिती पाहता प्रत्येक नागरिक अस्वस्थ आहे. जनतेच्या मनातील भावना, सत्तेचा दुरुपयोग, राजकीय साठमारी आणि वैचारिक अधःपतन यावर नेमके भाष्य करणारे हे प्रदर्शन आहे. शिवसेना पुणे शहराच्या माध्यमातून या प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे.”

या प्रसंगी शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, युवासेना शहर अधिकारी युवराज पारिख यांच्यासह अनेक ज्येष्ठ व तरुण शिवसैनिक उपस्थित होते.

‘शतकवीर बाळकडू’ व्यंगचित्र प्रदर्शन दिनांक २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत बालगंधर्व कलादालन येथे सर्व रसिक प्रेक्षकांसाठी खुले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कळावे
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!