बोपोडीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – बजमे ए नूर, मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन आणि पूना स्पोर्ट्स अॅथलेटिक क्लब यांचा संयुक्त क्रीडा महोत्सव संपन्न
ध्वजारोहणानंतर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, विजेत्या बालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान
बोपोडी, पुणे | २६ जानेवारी २०२६
प्रजासत्ताक दिनाच्या पावन निमित्ताने बजमे ए नूर, मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन आणि पूना स्पोर्ट्स अॅथलेटिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बोपोडी येथे भव्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.* राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.त्यानंतर मुलांसाठी आणि युवकांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये
• मॅरेथॉन स्पर्धा
• १०० मीटर धावणे
• लेमन स्पून रेस
• सॅक रेस
• स्लो सायकलिंग स्पर्धा
• मुला-मुलींसाठी विविध खेळ
या सर्व स्पर्धांचे आयोजन *मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन आणि पूना स्पोर्ट्स अॅथलेटिक क्लब यांच्या सहकार्याने करण्यात आले.*
सायंकाळी ७ वाजता बोपोडी येथे पारितोषिक वितरण समारंभ झाला.
स्पर्धेत विजयी झालेल्या मुलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले.

*प्रमुख उपस्थित मान्यवर :*
प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक *सनी निम्हण, नगरसेवक परशुराम वाडेकर, राष्ट्रीय खेळाडू अन्वर शेख,* माजी नगरसेवक नंदलाल धीवर, माजी उपनगरसेवक करीम शेख तसेच फिरोज मुल्ला, विनोद रणपिसे, प्राजक्ता गायकवाड, विजय ढोणे, विजय जगताप, फातिमा मुलानी, मुस्कान अत्तार, इंद्रजीत भालेराव, मुफ्ती आरिफ, विकास चव्हाण, हिदा पटेल, अल्ताफ पीरजादे, विठ्ठल अरुडे, दत्ता सूर्यवंशी, जुबेर पीरजादे, रियाज इनामदार, गुलाब तांबोळी, गनी मुजावर, शब्बीर काझी, शाबुद्दीन काझी, इक्बाल शेख, मुज्जिब बुखारी, हैदर सय्यद, करीम तुर्क, शकील तुर्क आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजीत भालेराव यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज साहेब यांच्या कुराण तिलावतीने झाली.
कार्यक्रमाचे आयोजन अन्वर शेख यांनी केले आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही त्यांनीच केले.
प्रस्तावना जुबेर पीरजादे यांनी मांडली

नगरसेवक सनी निम्हण यांनी बजमे ए नूर संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आठवण करून देत सर्व आयोजकांचे कौतुक केले.
नगरसेवक परशुराम वाडेकर यांनी मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशनच्या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाची विशेष प्रशंसा केली.
तीनही संस्थांची उल्लेखनीय कामगिरी :
बजमे ए नूर – युवकांना क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांद्वारे सकारात्मक दिशेने प्रेरित करण्यासाठी सातत्याने कार्यरत.
मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन समाजसेवा, महिला सशक्तीकरण, आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय योगदान देणारी अग्रगण्य संस्था.
पूना स्पोर्ट्स अॅथलेटिक क्लब स्थानिक खेळाडूंना प्रशिक्षण व व्यासपीठ उपलब्ध करून देत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू घडवणारी संस्था.
या संयुक्त उपक्रमामुळे परिसरातील मुलांमध्ये देशभक्ती, आरोग्य आणि खेळाची आवड निर्माण होण्यास मोठी मदत झाली. तर आभार प्रदर्शन करीम शेख यांनी केले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833






















