आज पुणे स्टेशन मालधक्का चौक तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कॉर्पोरेशन येथील पुलाखाली पाली ठोकून वास्तव्यास असलेल्या बेघर व वंचित मुलांसाठी माणुसकीचा आधार ठरणारा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन “आपली सप्तरंगी आई” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आम्रपाली मोहिते यांच्या पुढाकारातून या निराधार मुलांना खाऊ व दूध वाटप करण्यात आले.
या भागात वास्तव्यास असलेली अनेक मुले उपासमार, कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या दैनंदिन जीवनात थोडासा तरी आधार मिळावा, पोषण मिळावे आणि त्यांना मायेची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. आम्रपाली मोहिते यांनी यावेळी सांगितले की,
“ही मुले आपलीच आहेत. समाजाने त्यांच्याकडे पाठ फिरवू नये. एक वेळचे अन्न, एक ग्लास दूध आणि थोडीशी माया देखील त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते.”
या उपक्रमावेळी परिसरातील नागरिक व स्वयंसेवकांनीही सहकार्य केले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या सामाजिक उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
‘आपली सप्तरंगी आई’ या उपक्रमाअंतर्गत यापुढेही बेघर मुले, गरजू नागरिक, रुग्ण व वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आम्रपाली मोहिते यांनी दिली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























