Homeताज्या बातम्यामहामार्गावर तळबीड पोलिसांची धडक कारवाई, तासवडे फाट्यावर विदेशी दारू साठ्यासह युवक तळबीड...

महामार्गावर तळबीड पोलिसांची धडक कारवाई, तासवडे फाट्यावर विदेशी दारू साठ्यासह युवक तळबीड पोलिसांच्या ताब्यात!

महामार्गावर तळबीड पोलिसांची धडक कारवाई, तासवडे फाट्यावर विदेशी दारू साठ्यासह युवक तळबीड पोलिसांच्या ताब्यात!

(सातारा जिल्हा) प्रतिनिधी. उंब्रज-कराड राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी तळबीड पोलिसांनी गुरुवारी दि. 19 फेब्रुवारी 2026 दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारांस तासवडे गावाच्या फाट्यावर सापळा रचून धडक कारवाई केली. महामार्गावरून संशयित हालचाली करणाऱ्या दुचाकीची तपासणी दरम्यान एका युवकांकडे मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, दारूचा साठा व वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाढत्या बेकायदा दारू वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर तळबीड पोलिसांनी केलेल्या या कारवाईकडे अनेकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस शिपाई प्रविण जयवंत गायकवाड (ब. नं. 1875, तळबीड पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव सुखदेव कोरडे (वय 25) रा. गजानन हौसिंग सोसायटी, गोवारे ता.कराड जि. सातारा) हा युवक आपल्या ताब्यातील हिरो कंपनीची काळ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड (क्र. MH 50 D 1269) वरून परवानगीशिवाय विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना तळबीड पोलिसांना आढळून आला.
यावेळी पोलिसांनी एकूण सुमारे 19 हजार 400 किंमतीचा विदेशी दारूचा साठा हस्तगत केला आहे. यामध्ये विविध ब्रँडच्या 90 मि.ली., 180 मि.ली., 500 मि.ली. व 650 मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचा समावेश आहे.
जप्त साठ्यात ग्रॅन्ड मास्टर कॅनबेरी होडका, ग्रीन लेबल व्हिस्की, ओल्ड मंक रम, इम्पेरिअल ब्लू, रॉयल चॅलेंज, मास्टर डिलाईट, रॉयल ग्रीन, मॅकडोनाल्ड, मुंबई मल्ट, रॉयल स्टॅग तसेच टुबर्ग, किंगफिशर व लंडन पिल्सनर स्ट्रॉंग बिअरच्या बाटल्यांचा समावेश होता.
याशिवाय अंदाजे 30 हजार किंमतीची हिरो मेस्ट्रो मोपेड (क्र. MH 50 D 1269) देखील जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, PSI प्रशांत पाटील, ASI आनंदा रजपूत, पोलीस हवालदार योगेश भोसले, आप्पा ओंबसे, पोलीस नाईक कुपदीप कोळी पोलीस शिपाई प्रवीण गायकवाड, सुशांत कुंभार, अभय मोरे, मारुती बाकले यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर काळे करीत आहेत.
तळबीड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरांतील बेकायदा दारू वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तळबीड पोलीस ठाण्याचा पदभारही नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी नुकताच स्वीकारला असल्यामुळे या त्यांच्या पहिल्याच कामगिरीमुळे तळबीड पोलिसांचे जनतेतून विशेष कौतुक होत आहे. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्यासह तळबीड पोलीस ठाणेकडील आदीं कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!