Homeताज्या बातम्या“माझं कुंकू, माझा देश” आंदोलन – पाकिस्तानविरोधात शिवसेना पुणे शहर आक्रमक..

“माझं कुंकू, माझा देश” आंदोलन – पाकिस्तानविरोधात शिवसेना पुणे शहर आक्रमक..

“माझं कुंकू, माझा देश” आंदोलन – पाकिस्तानविरोधात शिवसेना पुणे शहर आक्रमक

पुणे :
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा बळी गेला. हिंदू भगिनींवर अतिरेक्यांनी केलेल्या या निर्दयी हल्ल्यानंतरही मोदी सरकार पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेते, हा निर्णय थेट देशद्रोही मानसिकतेचा आहे. भारतीयांचा अपमान करणाऱ्या या निर्णयाच्या तीव्र विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहर महिला आघाडी तर्फे “माझं कुंकू, माझा देश” हे राज्यव्यापी आंदोलन आज ऐतिहासिक लालमहाल चौकात दणक्यात पार पडले.

मोदी सरकार पाकिस्तानप्रेमात गुंतले असले, तरी शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे राष्ट्रप्रेमाची मशाल पेटवून ठेवणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शहर पदाधिकारी निकिता मारटकर यांनी संताप व्यक्त करताना स्पष्ट म्हटले की –
“पाकिस्तान हा न सुधारणारा दहशतवादी देश आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते, तर मोदी सरकारची कानउघडणी केली असती. मातांच्या कपाळावरील कुंकू पुसणाऱ्यांना पाकिस्तानात आसरा देणाऱ्यांसोबत क्रिकेट खेळणे, हे शहीदांच्या बलिदानाचा अवमान आहे. शिवसेना हे कधीही सहन करणार नाही!”

यावेळी महिला आघाडीच्या आक्रमक नेत्या निकिता मारटकर, रोहिणी कोल्हाळ, विद्या होडे, ज्योती चांदेरे, वैशाली दारवटकर, अमृता पठारे, सुनीता खंडाळकर, मृण्मयी लिमये, अनुष्का कुलकर्णी, रोहिणी मडोले, गायत्री गरुड, स्मिता पवार, दीपाली शिंदे, विजया बेंगळे, पार्वती कांबळे, वैशाली कांबळे, नसीम कांबळे यांनी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

तसेच आंदोलनाला शहरप्रमुख गजानन थरकुडे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दत्ता घुले, मुकुंद चव्हाण, सूर्यकांत पवार, विजय रावडे, सुशील पवार, मुकुंद गवळी, ओंकार मारणे, अनिकेत मारणे, चिंतामणी मुंगी यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी जंगी उपस्थिती लावली.

“शिवसेना हे आंदोलन थांबवणार नाही. पाकिस्तानशी सर्व संबंध तोडल्याशिवाय व शहीदांच्या बलिदानाचा बदला घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत!” – असा इशारा यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम; तीन दिवसांत 218 वाहनचालकांवर कारवाई

पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेकडून दर शुक्रवार, शनिवार व रविवार ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष कारवाई सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मद्यप्राशन...

पुणे मनपामध्ये मोठा घोटाळा उघड! खोट्या ATC परवानगीवर उंच इमारतींना मंजुरी ?

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात भविष्यात मोठा वैमानिक अपघात घडू शकतो अशी घोडचूक पुणे मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे, पुणे शहरातील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात...

नऱ्हे पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी २४ तासांत जेरबंद

पुणे : नऱ्हे पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर यांच्या संयुक्त कारवाईत घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अवघ्या...

शांतिनगर–येरवडा परिसरात मुळा नदीत धार्मिक कचरा टाकण्यामुळे वाढते प्रदूषण; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुणे, दि. — शांतिनगर–येरवडा पुलाजवळील मुळा नदी परिसरात धार्मिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्यामुळे नदी प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालल्याचे समोर आले आहे....

शाळा विशिष्ट दुकानातून गणवेश, पुस्तक खरेदीचा आग्रह धरू शकत नाहीत. पुणे बातम्या

पुणे: राज्याच्या शिक्षण विभागाने खाजगी शाळांना पालकांना गणवेश, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट विक्रेत्यांकडून किंवा शाळेकडून विकत घेण्यास भाग पाडण्यास मनाई केली आहे...

error: Content is protected !!