Homeताज्या बातम्याराहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी..

राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी..

राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी..

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.

१९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त (शिवजयंती) राहुरी शहरात आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सोहळा साजरा करण्यात आला. शिवप्रेमी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जुने सरकारी दवाखान्याच्या पटांगणात भव्य मंडप उभारून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती. मूर्तीला पुष्पहार, फुलांची आरास आणि विविध सजावटीने सजवले होते.
सकाळी लहान-थोरांनी उत्साहाने पूजा-अर्चना केली आणि छत्रपतींची आरती सादर केली. या वेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यामध्ये माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, साहेब संभाजी राजे तनपुरे, शिवसेनेचे शेतकरी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे, राजु भाऊ शेटे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, संभाजीराजे तनपुरे, अॅड. राहुल शेटे आदी उपस्थित होते.
पूजन आणि आरतीनंतर शहरातून भव्य टू-व्हीलर मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत चारचाकी वाहने, मोटरसायकल्ससह अनेक छोट्या शाळकरी मुलांनी आपल्या छोट्या सायकली घेऊन सहभाग घेतला आणि रॅलीला खास शोभा आणली. रॅलीतून “जय शिवराय”, “जय भवानी” चा जयघोष करत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढली गेली. राहुरीचे प्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे यांनी रॅलीतील सहभागींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन केले. यामध्ये मच्छिंद्र गुंड, राजेंद्र खोजे, रोहित नालकर, अविनाश क्षीरसागर आदींचा समावेश होता. तसेच नामदेव वांढेकर मेजर , विक्रम गाडे, कांता तनपुरे, गंगाधर सांगळे, मधुकर घाडगे, विनायक बाठे, राजेंद्र लबडे, विकास काशीद, रवींद्र तनपुरे, आबासाहेब तनपुरे, गणेश नेहे, कुलदीप नवले, प्रकाश नीवडुंगे, योगेश घाडगे, नंदकुमार ताराचंद तनपुरे, मयूर गाडेकर, जयराम भारमल,अशोक काका त नपुरे भाऊसाहेब बिडवे प्रीतम देशमुख महेश गुंजाळ प्रवीण शिरसाठ विशाल शेजुळ सोनू साठे भैय्या कलापुरे कोरडे साईराज तनपुरे विवेक सगळगीळे योगेश लबडे अल्ताफ शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या भक्तिपूर्ण गीतांनी, जयघोषांनी आणि उत्साहाने न्हाऊन निघाला होता. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतींच्या कार्यक्रमांना एकत्रित करून अधिक भव्य आणि दिव्य स्वरूप देण्याचा मानस कांता तनपुरे यांनी व्यक्त केला. सर्व समाजातील शिवभक्तांनी एकत्र येऊन भेदभाव विसरून एकजुटीने हा उत्सव साजरा केल्याने राहुरी शहरात आज खऱ्या अर्थाने शिवरायांचा जयघोष घुमला.
जय शिवराय! जय महाराष्ट्र! 🚩

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!