Homeताज्या बातम्याविश्रांतवाडी परिसरात मध्यरात्री फटाका सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची...

विश्रांतवाडी परिसरात मध्यरात्री फटाका सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; चार दुचाकी जप्त

पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६ : विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरी परिसरात मध्यरात्री काही तरुणांनी बुलेट तसेच अन्य दुचाकींच्या बदललेल्या (फटाका) सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करत धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.

तक्रारीची गंभीर दखल घेत विश्रांतवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित वाहनांचा व चालकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईदरम्यान दोन बुलेट, एक केटीएम आणि एक स्प्लेंडर अशा एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. संबंधित वाहनांवरील कर्णकर्कश आवाज करणारे फटाका सायलेन्सर काढून नष्ट करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण अंदाजे किंमत ₹५.७५ लाख इतकी आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली असून, सार्वजनिक शांतता व नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

error: Content is protected !!