Homeताज्या बातम्यादौड शहरामधील धोकादायक इसम एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध

दौड शहरामधील धोकादायक इसम एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अटकेची धडक कारवाई.
​पुणे ग्रामीण / विशेष प्रतिनिधी:
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांची उपद्रवमूल्ये मोडीst काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यामध्ये मागील ५ वर्षांच्या कालावधीत गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर मुक्त झालेल्या आरोपींचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार दरोडा, जबरी चोरी, हायवे रोडवरील लुटमार, खंडणी, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार अशा गुन्ह्यांत सक्रिय असणाऱ्या धोकादायक व्यक्तींवर एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
​आरोपी रितेश भिमराव गायकवाड याच्यावर दाखल ७ गंभीर गुन्हे
​या विशेष मोहिमेदरम्यान, दौंड पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास असलेला सराईत व धोकादायक इसम रितेश भिमराव गायकवाड (वय २७ वर्षे, रा. भीमनगर, दौड, ता. दौड, जि. पुणे) याचे रेकॉर्ड तपासण्यात आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खालीलप्रमाणे एकूण ७ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले:
​संगनमत करून घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे.
​अल्पवयीन मुलीचा विनयभंग व विवस्त्र करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.
​घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवून शिवीगाळ व दमदाटी करणे.
​अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फौजदारीपात्र बलप्रयोग व गैरपणे अटकाव करणे.
​दरोडा घालणे व जबर दुखापत पोहोचवणे.
​स्त्रीचा विनयभंग व विवस्त्र करण्याच्या उद्देशाने हल्ला करून चोरून पाठलाग करणे.
​मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास भाग पाडण्यासाठी दुखापत पोहोचवणे.
​(जुना भारतीय दंड विधान १८६० चे प्रकरण १६ व नवीन भारतीय न्यायसंहिता २०२३ चे प्रकरण ०६ व १७ मधील तरतुदींनुसार हे गुन्हे दाखल आहेत.)
​एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
​आरोपी सराईत व धोकादायक असल्याने त्याचेविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे यांनी पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. पोलीस अधीक्षकांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून तो पुढील कार्यवाहीसाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठवला.
​जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेटस, वाळू तस्कर, काळाबाजार करणारे, बेकायदेशीर जुगार/लॉटरी चालवणारे आणि मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम १९८१ (सुधारणा अधिनियम सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९)’ अन्वये आदेश क्रमांक पगम/एम.पी.डी.ए./एस.आर./१५/०१/२०२६ दिनांक ३१/०७/२०२६ नुसार इसम रितेश भिमराव गायकवाड यास स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला.
​नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
​जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत शेडगे यांनी विविध पथके तयार करून शोध घेतला आणि दिनांक ०२/०८/२०२६ रोजी आरोपी रितेश भिमराव गायकवाड यास ताब्यात घेऊन त्यास मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दाखल करून स्थानबद्धतेची कायदेशीर कारवाई पूर्ण केली.
​यशस्वी कामगिरीत सहभागी अधिकारी व अंमलदार
​ही धडक कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
​मार्गदर्शक: मा. श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. गणेश बिरादार (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग), मा. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड उपविभाग).
​प्रमुख पथक: श्री. प्रमोद क्षीरसागर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), श्री. हेमंत शेडगे (पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस स्टेशन), श्री. विनायक सपाटे (सहायक पोलीस निरीक्षक), श्री. अब्दुल ब्रिदी (पोलीस उपनिरीक्षक), श्री. सागर चव्हाण (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक).
​सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व अंमलदार: सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, रामदास बाबर, पो.कॉ. वैभव सावंत (स्थानिक गुन्हे शाखा), सहा. पो. फौजदार विजय पवार, पो.हवा. नितीन चव्हाण, गजानन शिंदे, राहुल घाडगे, धनंजय गाढवे, निखिल जाधव, अप्पा गिरमे, तसेच पोलीस अंमलदार निखिल पवार, सोमनाथ चौंडे, अण्णा हजारे, सचिन साप्ते (दौंड पोलीस स्टेशन).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!