Homeक्राईमशिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन आरोपी जेरबंद

पुणे ग्रामीण:
‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजन कुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर यांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पथक तयार केले होते. स्थानिक गुन्हे शाखेची एन.डी.पी.एस. अंतर्गत ही या आठवड्यातील तिसरी कारवाई आहे.
​२६ ऑगस्ट २०२६ रोजीची मुख्य कारवाई
​दिनांक २६/०८/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घाजत असताना, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील न्हावरा-तळेगाव रोडवर प्रदीप विठ्ठल कोरेकर हा एम.डी. विक्रीसाठी येणार असल्याबाबतची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शिरूर उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त करून पंचांसमक्ष छापा टाकला असता, खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
​प्रदीप विठ्ठल कोरेकर (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे)
​साईनाथ जनार्दन भोसेकर (वय ३५ वर्षे, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे)
​जप्त केलेला मुद्देमाल: त्यांच्या ताब्यातून ५६ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधीत एम.डी. अंमली पदार्थ (किंमत ११,२०,००० रुपये), एक मोटारसायकल (किंमत ३०,००० रुपये) आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ११,९०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७६९/२०२६, एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २१ (ब), २२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​या आठवड्यातील मागील इतर कारवाया
​दिनांक १८/०८/२०२६ रोजीची कारवाई:
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुरेंद्रसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४ वर्षे, सध्या रा. मनीष शिरोळे फॉर्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राज्य राजस्थान ३४४०२६) आणि श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१ वर्षे, रा. मनीष शिरोळे फॉर्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. बांकियावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राज्य राजस्थान) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात ११० ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत एम.डी. व मोटारसायकल असा २२,००,००० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७४४/२०२६, एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​दिनांक १९/०८/२०२६ रोजीची कारवाई:
या कारवाईदरम्यान दादा बबन धावडे (वय २७ वर्षे, रा. कोल्हेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि अमोल राजाराम पोटावळे (वय ३५ वर्षे, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यात २० ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत एम.डी. व स्कॉर्पिओ कार असा ९,१०,००० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७५०/२०२६, एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २१ (ब), २२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​नागरिकांसाठी पोलीस प्रशासनाचे आवाहन
​पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी सर्व नागरिक व पालकांना आवाहन केले आहे की, युवा पिढीला ड्रग्सच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून हे अवैध जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या परिसरात अंमली पदार्थाची विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांची माहिती देऊन सहकार्य करावे; माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल.
​सहभागी पोलीस पथक
​सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (पुणे विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र भासले (शिरूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत दिवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके, तसेच पोलीस अंमलदार स.फौ. संजय पड्याळ, पो.हवा. तुषार पंदारे, पो.हवा. जनार्दन शेळके, पो.हवा. संजू जाधव, पो.हवा. राजु मोमीन, पो.हवा. विकास पाटील, पो.शि. सागर धुमाळ आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पो.अंमलदार बाळू भवर, गिराम व चितारे यांनी पार पाडली. या गुन्ह्यांचा पुढील समांतर तपास शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!