पुणे:: सनश्री बिल्डिंग या निवासी इमारतीमध्ये आगीची घटना, इमारतीला आग; घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू, दोघे जखमी कोंढवा परिसरातील दुपारी ३:सुमारस वाजता भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी, आगीचे नेमके कारण समजल नाही.तर या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील प्रसिद्ध सनश्री बिल्डिंग मध्ये अचानक आगीचे लोट दिसून आले. स्थानिक नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाला आणि पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नेमकी आग कशामुळे लागली, हे अजून स्पष्ट झालेले नाहीमात्र प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किट किंवा गॅस गळती यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विद्युत तांत्रिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली असून, याबाबत सखोल तपास सुरू आहे. इमारतीत अडकलेल्या काही रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग आटोक्यात आली आहे. त्याचबरोबर या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मारा सुरू केला आहे. आगीचा इतर मजल्यांवर फैलाव होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहेत. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. काही रहिवाशांनी इमारतीतील सुरक्षितता उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत..

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.