तलवारीने केक कापणे पडलं महागात
पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २१ फेब्रुवारी २०२६ ; हडपसरमधील एका अल्पवयीन बड्डे बॉयला तलवारीने केक कापणे चांगलेच अंगलट आले असून, त्याच्यासह इतर मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार हडपसर येथील शेवकर वस्ती भागात घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पोलिस अमंलदार अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दिनांक १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
पुणे पोलिसांनी हत्यारांचा वापर करून रस्त्यावरच केक कापत दहशत पसरविण्याचे गुन्हेगारी कृत्य करू नये, अशा वारंवार सुचाना दिल्या आहेत. दरम्यान, एका इन्स्ट्राग्राम अकाउंटवर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ टाकला होता. या व्हिडीओत धारदार तलवारीनी केक कापून नंतर तलवार हवेत नाचवून दहशत पसरविल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान हा वाढदिवस हडपसर येथील शेवकर वस्ती, लक्ष्मीनगर येथील यल्लाम्मा मंदिराजवळ रस्त्यावर साजरा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार, तेथील नागरिकांकडे विचारपूस केली असता दिनांक १७ फेब्रुवारी रात्री नऊच्या सुमारास वाढदिवस साजरा केला. धारदार तलवारीने केक कापून नंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी दहशत पसरविल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बड्डे बॉय आणि त्याच्या साथीदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























