Homeताज्या बातम्याआरटीई प्रवेश प्रक्रियेतील ‘१ ते ३ किमी’ अटीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा तीव्र...

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील ‘१ ते ३ किमी’ अटीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा तीव्र इशारा

पुणे : आरटीई (Right to Education) प्रवेश प्रक्रियेत यंदा लागू करण्यात आलेल्या ‘१ ते ३ किलोमीटर अंतर’ अटीविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुणे शहरातील पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या अटीमुळे हजारो वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून दूर राहावे लागणार आहे.

आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, दरवर्षी आरटीईअंतर्गत अनेक पालकांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश मिळत होता. मात्र यंदा ‘१ ते ३ किमी’ मर्यादा कडक केल्याने अनेक शाळांनी प्रवेश बंद केल्याची तक्रार आहे. परिणामी सुमारे २५ हजार वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असा दावा करण्यात आला.
“भारतीय संविधानाने दिलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क अशा जाचक अटींमुळे मर्यादित होऊ नये. राज्य शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ही अट रद्द करावी,” अशी मागणी आघाडीने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे...

​पुणे, दिनांक २९ जून २०२६: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

error: Content is protected !!