Homeताज्या बातम्याउरळी कांचन : गौणखनिज उत्खननात मंडळ अधिकारी व तलाठ्यांची ‘बकासुरी’ – प्रशासन...

उरळी कांचन : गौणखनिज उत्खननात मंडळ अधिकारी व तलाठ्यांची ‘बकासुरी’ – प्रशासन डोळेझाक करतंय का?

उरळी कांचन (ता. हवेली) | प्रतिनिधी

उरळी कांचन परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले गौणखनिज उत्खनन हे आता केवळ बेकायदेशीर उद्योग न राहता, काही मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने चालणारी बकासुरी असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहेत. नदीपात्रे, ओढे, शासकीय व खासगी जमिनींवर रात्रंदिवस उत्खनन सुरू असून, महसूल प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, उत्खननाची माहिती वेळोवेळी देऊनही कारवाई शून्य आहे. उलट, कारवाईची शक्यता निर्माण झाली की संबंधित यंत्रणा आधीच सावध होतात, यामुळे “माहिती आतूनच लीक होते का?” असा प्रश्न उपस्थित होतो. जे अधिकारी कायद्याचे रक्षण करणारे असायला हवेत, तेच जर गौणखनिज उत्खनन अधिकारी असल्याप्रमाणे वागत असतील, तर सामान्य नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची?

या बेकायदेशीर उत्खननामुळे:नदीपात्रांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे शेतीची उपजाऊ माती नष्ट होत आहे
भूजल पातळी घसरत आहे गावातील रस्ते व पायाभूत सुविधा उध्वस्त होत आहेत
तक्रारदारांनी असा आरोपही केला आहे की, काही प्रकरणांत तक्रार केल्यानंतर तक्रारदारांवरच दबाव टाकला जातो. हा प्रकार लोकशाही मूल्यांना आणि कायद्याच्या राज्याला काळिमा फासणारा आहे.

नागरिकांच्या ठोस मागण्या

1. उरळी कांचन परिसरातील सर्व उत्खनन प्रकरणांची स्वतंत्र चौकशी

2. दोषी मंडळ अधिकारी व तलाठ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाई

3. उत्खननामुळे झालेल्या पर्यावरणीय हानीची भरपाई व पुनर्स्थापना

4. तक्रारदारांचे संरक्षण आणि तक्रारींवर वेळबद्ध कारवाई

जर तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर हे ‘बकासुर’ गावाची नैसर्गिक संपत्ती गिळंकृत करत राहतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता पाहायचे इतकेच की, प्रशासन जागे होते की मौनच पाळते?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओतूरजवळ टोमॅटोने भरलेल्या ट्रकच्या धडकेत तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण-नगर महामार्गावरील ओतूरजवळील उदापूर गावात रविवारी दुपारी 1 वाजता मोटारसायकलला ट्रकने धडक दिल्याने अहिल्यानगर...

NEET-UG री-टेस्टमध्ये भौतिकशास्त्र इच्छुकांना आव्हान देते, जीवशास्त्र दिलासा देते. पुणे बातम्या

NEET उमेदवार शहरातील परीक्षा केंद्रावर त्यांची नावे तपासतात पुणे : रविवारी NEET-UG 2026 च्या पुनर्परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांनी पेपर मध्यम कठीण असल्याचे वर्णन केले,...

एका व्यक्तीने मोबाईल दुकानमालकाची १.३५ लाख रुपयांची फसवणूक केली पुणे बातम्या

पुणे : मोबाईल दुकानदाराची १.३५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा तळेगाव एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत.ही घटना 16 जून रोजी घडली. दुकान...

संशोधन परिसंस्थेच्या भविष्यावर आज पुण्यात भेटा | पुणे बातम्या

पुणे : "संशोधनामधील आत्मविश्वास: भविष्यातील संशोधक - भारत चर्चा" या विषयावरील राष्ट्रीय गोलमेज चर्चेसाठी आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि संशोधन तज्ञ सोमवारी पुण्यात...

उच्च परताव्याच्या आमिषाने किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या मान...

एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी माण आणि हिंजवडी परिसरातून तब्बल २२ जणांना ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील...

error: Content is protected !!