Homeताज्या बातम्याउमेदवार यादीत अचानक बदल; प्रभाग २७ नवी पेठ–पर्वतीतील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर...

उमेदवार यादीत अचानक बदल; प्रभाग २७ नवी पेठ–पर्वतीतील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

उमेदवार यादीत अचानक बदल; प्रभाग २७ नवी पेठ–पर्वतीतील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उमेदवार क्षीरसागर अनिकेत वामन यांचा गंभीर आरोप
पुणे | प्रतिनिधी
कसबा विश्राम क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २७ (नवी पेठ – पर्वती) येथे सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गंभीर स्वरूपाचा अन्याय व अपारदर्शकता झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे उमेदवार क्षीरसागर अनिकेत वामन यांनी केला आहे. अधिकृत उमेदवार यादीत कोणताही खुलासा न देता अचानक बदल करण्यात आल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडणूक प्रशासनामार्फत दि. ३ जानेवारी रोजी पहिली अधिकृत उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत नियमांनुसार पात्र उमेदवारांचा अनुक्रम निश्चित करण्यात आला होता. या यादीच्या आधारे उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्याच दिवशी दुसरी यादी तयार करण्यात आली असून, ही बदललेली यादी दि. ७ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. विशेष म्हणजे या दुसऱ्या यादीवर देखील दि. ३ जानेवारी हीच तारीख नमूद आहे.
कोणताही लेखी खुलासा, कारण किंवा नियमांचा आधार न देता पहिल्या अधिकृत यादीत बदल करण्यात आल्याने उमेदवारांमध्ये तसेच मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकदा अधिकृतरीत्या उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारे बदल करणे हे लोकशाही मूल्यांना धरून नसून, यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, पहिल्या यादीत क्षीरसागर अनिकेत वामन यांचा अनुक्रमांक दुसरा असताना, नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत त्यांचा क्रमांक थेट सहाव्या स्थानावर नेण्यात आला आहे. या बदलामुळे उमेदवारांचे नियोजन, प्रचार आणि मतदारांमध्ये पोहोचण्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
दरम्यान, हा बदल सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या दबावामुळे करण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत क्षीरसागर अनिकेत वामन यांनी निवडणूक प्रशासनाकडे लेखी खुलासा व चौकशीची मागणी केली आहे.
यासंदर्भात क्षीरसागर अनिकेत वामन म्हणाले,
“निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रथम प्रसिद्ध केलेल्या यादीतील अनुक्रमांकानुसार आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांनी अचानक दुसरी यादी प्रसिद्ध झाल्यामुळे उमेदवारांमध्ये तसेच मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर गंभीर परिणाम होत आहेत.”
अशा महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाकडून झालेल्या या प्रकारच्या निर्णयांमुळे उमेदवारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘लैंगिक गुन्ह्यांचा इतिहास आहे’: पुण्यात 65 वर्षीय व्यक्तीवर बलात्कार, 3 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक;...

पुणे - भोर तालुक्यातील नसरापूरजवळ शुक्रवारी दुपारी तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येनंतर जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात संताप आणि निदर्शने झाली,...

डी.एस.स्वामी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पुणे बातम्या

नाशिक : डीएस स्वामी यांनी शनिवारी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून पदभार स्वीकारला. ते आउटगोइंग एसपी बाळासाहेब पाटील यांच्यानंतर पोलीस उपायुक्त...

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले | पुणे बातम्या

पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला. पुणे बातम्या

पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

उपग्रह आणि ग्राउंड डेटा वापरून अंदाज अचूकता सुधारण्यासाठी IITM-ISRO टाय-अप | पुणे बातम्या

पुणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटर यांच्यातील सहकार्याचा उद्देश भू-आधारित मोजमापांसह उपग्रह निरीक्षणे एकत्रित करून हवामान अंदाजांची अचूकता...

error: Content is protected !!