Homeताज्या बातम्याऔंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे...

औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २४ फेब्रुवारी २०२६ : पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यात उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड, तसेच आरपीआयचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, ज्ञानेश्वर जावीर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीबाबत माहिती देताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले की, प्रभागातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी आयुक्तांकडे मागील अनेक दिवसांपासून वेळ मागण्यात येत होता. मात्र काल आयुक्तांनी स्वतःहून प्रभागाला भेट देण्याची तयारी दर्शवत, नागरिकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता आयुक्तांनी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली.

या दौऱ्यात तथागत भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम (चिखलवाडी) तसेच हरीश ब्रिज शेजारील मोकळे पटांगण या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सर्व संबंधित खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त नवल किशोर राम यांनी विपश्यना विहार व हॉकी स्टेडियमच्या प्रलंबित कामांचा आढावा घेत, ही कामे कोणताही विलंब न लावता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जागेवरच दिले. तसेच हरीश ब्रिजलगत असलेल्या मोकळ्या पटांगणाच्या ठिकाणी नागरिकांसाठी सुसज्ज उद्यान (गार्डन) विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

या प्रत्यक्ष पाहणीमुळे औंध–बोपोडी प्रभागातील रखडलेले व महत्त्वाचे प्रकल्प आता वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी त्यांचा सन्मान करून वेळ दिल्याबद्दल आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

error: Content is protected !!