Homeताज्या बातम्याकोलवडी–साष्ठे येथे २२९.६० लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कोलवडी–साष्ठे येथे २२९.६० लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कोलवडी–साष्ठे येथे २२९.६० लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

हवेली (पुणे) | प्रतिनिधी

कोलवडी–साष्ठे (ता. हवेली) परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे २२९.६० लाख रुपयांच्या निधीतून या विकासकामांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, यामुळे परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहेत.

या विकासकामांचे भूमिपूजन आमदार पै. ज्ञानेश्वर कटके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना आमदार कटके यांनी सांगितले की, “मी काम करत आलो आहे, काम करत राहणार आहे आणि कामात कधीही फरक पडू देणार नाही. नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. या विश्वासाच्या बळावर विकासाची योग्य दिशा ठरवत पुढे वाटचाल करत राहू.”

स्थानिक नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन प्रत्येक विकासकाम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी म्हणून संवेदनशील व जबाबदार भूमिका निभावण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

विकासकामांचा तपशील

या कार्यक्रमांतर्गत खालील महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले—

कोलवडी ते भालसिंग वस्ती रस्ता — ₹१५०.०० लाख

कोलवडी केसवंद शिव रस्त्यावरील ओढ्यावर साकव बांधकाम — ₹२०.०० लाख

साष्ठे येथील सोनमळा वस्ती रस्ता — ₹१५.५० लाख

अधिव्यनायक महामार्ग ते समर्थ पार्क रस्ता — ₹१५.२० लाख

कोलवडी येथील शितोळे वस्ती रस्ता — ₹२०.५० लाख

साडे येथील पुणेवाडी मारुती मंदिर रस्ता — ₹१०.५० लाख

या विविध विकासकामांमुळे रस्ते, दळणवळण व सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम होऊन ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडून येणार आहे.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित

या उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यास पोपट दादा गायकवाड, तुकाराम आबा पवार, रामदास अण्णा गायकवाड, शशिकांत दादा गायकवाड, पंकज भाऊ गायकवाड, विकास सुदाम कांचन, बाजीराव आप्पा भालसिंग, बाळासाहेब नाना भाडळे, सतीश आबा गायकवाड, विलास बापू भोसले, अमर आबा गायकवाड, अशोक सुदाम गायकवाड, संतोष आप्पा मुरकुटे, स्वप्निल बाळासाहेब उंद्रे, योगेश दत्तात्रय उंद्रे, अमोल पाटील गायकवाड व रवींद्र गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे आभार मानले. या विकासकामांमुळे कोलवडी–साडे परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: चतुःश्रृंगी परिसरातून १९.५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनने अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. गोखलेनगर परिसरातून तब्बल १९,५१,१५०/- रुपये किमतीचा...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

error: Content is protected !!