शिवद्रोही भाजपचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध
पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात — भाजप व प्रशासन जबाबदार
पुणे | दि.१९/१२/२०२५
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि इतिहासाचा अपमान करणाऱ्या भाजप व पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात शिवसेनेच्या वतीने आज पेशवे पार्क येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
१२ हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या पुणे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली पेशवे पार्क येथील शिवसृष्टी आज धुळखात पडलेली आहे, ही बाब पुणेकरांसाठी लाजिरवाणी व संतापजनक आहे. प्रभागात भाजपचे तब्बल ५ नगरसेवक असतानाही शिवसृष्टीची ही दुरवस्था म्हणजे भाजपची शिवविचारांबाबतची उदासीनता व शिवद्रोही मानसिकता उघड करणारी आहे.
याच निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
“शिवद्रोही भाजपचा निषेध असो”, “शिवसृष्टीचा अपमान सहन करणार नाही”, “प्रशासनाची दिरंगाई बंद करा” अशा घोषणांनी संपूर्ण पेशवे पार्क परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात
शहरप्रमुख श्री. संजय मोरे,
गजानन थरकुडे, गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख भारत कुंभारकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत,
दिलीप पोमन, मुकुंद चव्हाण, राजू चव्हाण, गोविंद निंबाळकर, गणेश घोलप, रणजीत शिंदे, संदीप गायकवाड, संजय साळवी, सुरज लोखंडे, रमेश परदेशी, गजानन देशमुख, चंदन बेंडवाल, निलेश वाघमारे, राहुल शेडगे, संजय वाल्हेकर, ज्ञानेश्वर पोळ, गणेश पोकळे, निलेश आल्हाट, पुरुषोत्तम विटेकर, अमित पापल, जगदीश दिघे, नागेश खडके, राजेश शेलार, अमर मारतकर, सूरज खंडाळे, सनी गायकवाड, सोमनाथ खांगटे तसेच
महिला आघाडीच्या पद्माताई सोरटे, सोनाली जुनावणे, गायत्री गरुड, गौरी चव्हाण आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसृष्टीच्या दुरवस्थेस भाजप व महापालिका प्रशासन पूर्णतः जबाबदार असून, तात्काळ दुरुस्ती व देखभाल न झाल्यास शिवसेना अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























