Homeताज्या बातम्यादीड वर्षांचा पाठपुरावा, सर्व पुरावे सादर — तरीही पीएमसी अधिकाऱ्यांची टाळाटाळ: पुणे...

दीड वर्षांचा पाठपुरावा, सर्व पुरावे सादर — तरीही पीएमसी अधिकाऱ्यांची टाळाटाळ: पुणे शिक्षण मंडळातील फाईलफेरीचा धक्कादायक प्रकार

पुणे :
पुणे शहरातील शिक्षण मंडळ कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून तीन अपत्ये असतानाही नोकरी सुरू ठेवली असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने गेले दीड वर्ष सातत्याने पाठपुरावा करत सर्व वैध पुरावे, कागदपत्रे, जन्मनोंदी व लेखी तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केल्या आहेत. मात्र, तरीही आजतागायत कोणतीही ठोस किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक निर्णय टाळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. फाईल कधी एका टेबलावर, तर कधी दुसऱ्या टेबलावर पाठवून “चौकशी सुरू आहे”, “वरच्या कार्यालयाकडे प्रस्ताव आहे” अशी ठरावीक उत्तरे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून प्रशासनातील टाळाटाळ व संभाव्य संगनमताकडे निर्देश करणारी आहे.
राज्य शासनाच्या सेवाशर्ती व नियमांनुसार दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणे बंधनकारक असताना, शिक्षण मंडळातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात आहे. सामान्य कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणारे हेच प्रशासन, या प्रकरणात मात्र मौन का बाळगत आहे? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकारामुळे नियम पाळणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, “नियम सर्वांसाठी समान नाहीत का?” असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जर या प्रकरणात तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांसह कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाही, तर हे प्रकरण राज्य शासन, संबंधित आयुक्त कार्यालय, तसेच न्यायालयीन स्तरावर नेले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात येत आहे.
प्रशासनाने वेळकाढूपणा थांबवून तात्काळ निर्णय घ्यावा व जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, अन्यथा हा अन्याय उघडपणे रस्त्यावर आणला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!