Homeताज्या बातम्यापुजारी बनून चोर मंदिरात पोहोचला, देवाला हात जोडले अन् नको तेच केले,...

पुजारी बनून चोर मंदिरात पोहोचला, देवाला हात जोडले अन् नको तेच केले, शेवटी एक चूक नडली

पुजारी बनून चोर मंदिरात पोहोचला, देवाला हात जोडले अन् नको तेच केले, शेवटी एक चूक नडली

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २ मार्च २०२६ : देवाच्या दर्शनासाठी अनेक भक्त मंदिरात येत असतात. तर मंदिरात पुजारी ही देवाच्या सेवेसाठी असतात. मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांचे मन प्रसन्न होतं. त्यामुळे अनेक भक्त हे मंदिरात दर्शनासाठी जात असतात.

पण काही भक्त असे ही असतात त्यांचा मंदिरात जाण्याचा उद्देश इतरां पेक्षा फार वेगळा असतो. अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चिंचवडमध्ये घडली आहे. इथं एका चोराने चोरी करण्याच्या उद्देशाने थेट पुजाऱ्याचा वेश घेतला होता. सर्वा काही त्याच्या मनासारखे झाले होते. पण त्याची एक चुक नडली आणि खेळ खल्लास झाला.

चिंचवड येथे भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. या मंदिरात चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. नरेश अगरचंद जैन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरी करण्यासाठी या भामट्याने भन्नाट शक्कल लढवली होती. त्याने पुजाऱ्याची वेशभूषा केली होती. त्यानंतर तो मंदिरात चोरी करण्यासाठी गेला. सर्व काही त्याच्या प्लॅन प्रमाणे होत होते. त्याने मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी देवाचे दर्शन घेतले.

त्यानंतर संधी साधून देवाच्या चांदीच्या मुकूटावर डल्ला मारला. हा मुकूट साधारण अडीच लाख रुपये किमतीचा होता. तो मुकूट त्याने कपड्याने झाकला. आपला डाव यशस्वी झाला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो तिथून मुकुट घेवून तो शिताफीने मंदिरातून पसार झाला. मात्र तो एक गोष्ट विसरला. ती म्हणजे या मंदिरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे. या कॅमेऱ्यानी चोराची प्रत्येक एक कृती कैद केली होती. याचा मात्र त्याला विसर पडला होता. त्यामुळे ती बिनधास्त पणे तिथून पळून गेला. आता आपली मजा आहे याची स्वप्न तो पाहात होता.

चोरी झाल्याचे मंदिर प्रशासनाला समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट १ ने तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतली. त्यावरून चोराची ओळख पटली. त्यानंतर पुढील ४८ तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश जैन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये १२ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे...

​पुणे, दिनांक २९ जून २०२६: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात. पुणे बातम्या

पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी. पुणे बातम्या

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

error: Content is protected !!