Homeताज्या बातम्यापुणे खासदारांच्या जनता दरबारात त्यांच्याच भ्रष्ट पदाधिकाऱ्या विरोधात आणि प्रशासना विरोधात तक्रार

पुणे खासदारांच्या जनता दरबारात त्यांच्याच भ्रष्ट पदाधिकाऱ्या विरोधात आणि प्रशासना विरोधात तक्रार

खासदार जनसंपर्क अभियानात प्रशासन व भाजप शहराध्यक्षांशी निगडित तक्रार..
वीज चोरी, बेकायदेशीर करार व शासकीय जागेवर अतिक्रमणाबाबत खासदार मुरलीधर मोहोळ यांना सागर धाडवे यांची भेटून लेखी तक्रार

पुणे | प्रतिनिधी
सदाशिव पेठेतील साने गुरुजी वसाहत परिसरात सुरू असलेल्या वीज चोरी, पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीचा गैरवापर, बेकायदेशीर करार व शासकीय जागेवरील अतिक्रमण याबाबत रहिवासी सागर धाडवे यांनी पुण्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांची जनसंपर्क अभियानात प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर लेखी तक्रार सादर केली आहे.

ही तक्रार खासदार जनसंपर्क अभियान जनता दरबार, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात देण्यात आली असून, यावेळी खासदार मोहोळ यांनी “प्रकरण गंभीर असून लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल” असे आश्वासन तक्रारदार सागर धाडवे यांना दिले आहे.
यावेळी व्यासपीठावर खासदार मोहोळ यांसोबत, आमदार हेमंत रासने, ज्यांच्या कार्यशैलीवर तक्रार आहे ते स्वतः भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते यामुळे काहीकाळ जनसंपर्क अभियानात भाजप पदाधिकाऱ्यांची धांदल उडाली होती.

वीज चोरी सिद्ध, मात्र FIR नाही – संगनमताचा आरोप

साने गुरुजी वसाहतीतील गेजगे व्यायाम शाळा येथे वीज चोरी होत असल्याची तक्रार केल्यानंतर महावितरणने स्थळपाणी करून वीज चोरी सिद्ध केली असून, विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अंतर्गत अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
मात्र, कायद्यानुसार FIR दाखल करणे बंधनकारक असतानाही अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही, हा कायद्याचा गंभीर भंग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

१३ वर्षांच्या वापरासाठी केवळ १ वर्षाचा दंड?

सदर व्यायाम शाळा ही साने गुरुजी तरुण मंडळ ट्रस्ट मार्फत मागील १३ वर्षांपासून सुरू असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ १ वर्षाचा दंड आकारण्यात आला.
विशेष म्हणजे हा दंड पुणे महानगरपालिकेच्या नावाने लावून रु. ९५,०००/- रोख स्वरूपात स्वीकारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून, ही बाब अत्यंत संशयास्पद असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

बेकायदेशीर करार, ट्रस्ट नियमांचे उल्लंघन

वीज चोरी व गैरप्रकार झाकण्यासाठी पुणे मनपा व साने गुरुजी तरुण मंडळ ट्रस्ट यांच्यात बेकायदेशीर करार करण्यात आल्याचा आरोप आहे.
हा करार करताना —
• ट्रस्टचा ऑडिट अहवाल
• चेंज रिपोर्ट
• ठरावाची प्रत
• धर्मादाय आयुक्तांची परवानगी
यापैकी एकही कागदपत्र तपासले गेले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच, ज्या व्यक्तीच्या नावाने करार करण्यात आला आहे, ती व्यक्ती ट्रस्टची पदाधिकारी नसतानाही करार करण्यात आल्याने तो पूर्णतः बेकायदेशीर ठरतो, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

शासकीय नाल्यावर अतिक्रमण

करारामध्ये नमूद केलेली जागा ही प्रत्यक्षात आंबील ओढा (नाला) येथील अतिक्रमित शासकीय जमीन असल्याचे समोर आले आहे.
शासकीय मोजणीची ‘क’ प्रत तपासल्यानंतर ही बाब स्पष्ट झाल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे.

धर्मादाय विभागात २० वर्षांची अनियमितता

साने गुरुजी तरुण मंडळ ट्रस्टने आणि अध्यक्ष घाटे यांनी मागील २० वर्षांपासून चेंज रिपोर्ट व ऑडिट अहवाल सादर न केल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
या प्रकरणी तक्रारदार सागर धाडवे यांनी धर्मादाय न्यायालयात कलम 41(ड) व 41(ई) अंतर्गत दोन स्वतंत्र प्रकरणे दाखल केली असून, त्यामध्ये संबंधित ट्रस्टला आणि पदाधिकाऱ्यांना रु. ५,०००/- दंड ठोठावण्यात आला आहे.
कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणात —
• बेकायदेशीर करार तत्काळ रद्द करावा
• वीज चोरीप्रकरणी FIR दाखल करावी
• पुणे मनपा, महावितरण व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी
• शासकीय अतिक्रमित जागा त्वरित मुक्त करावी
अशी ठोस मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
याविषयावर बोलताना तक्रारदार सागर धाडवे म्हणाले मी गेले वर्षभर या विषयात प्रशासनाशी काम करत असून प्रशासनावर राजकीय दबाव आहे त्यामुळे कारवाईत दिरंगाई केली जात आहे, म्हणूनच पुणेकरांनी निवडून दिलेले खासदार या विषयात राजकारण बाजूला ठेऊन योग्य कारवाई करतील अन्यथा मी या विषयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आडवा होण्यासाठी ही तयार आहे.

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याने आता प्रशासनाकडून नेमकी कोणती पावले उचलली जातात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
सागर धाडवे
9762792769

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुरुषाची निर्दोष मुक्तता. पुणे बातम्या

पुणे : आपल्या चार वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या २५ वर्षीय तरुणाची सत्र न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली.कोर्टाने म्हटले...

पुरंदर वादळी वाऱ्याची चिंता : पुणे जिल्हा प्रशासनाची सुरक्षा योजना | पुणे बातम्या

पुणे: प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी गुरुवारी भूसंपादन सुरू होणार असून, मोठ्या प्रमाणात मोबदला देणाऱ्या गावकऱ्यांचा अपव्यय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सुरक्षा व्यवस्थेची...

थेऊरच्या श्री चिंतामणी चरणी भाविकांची मांदियाळी; अंगारक संकष्टी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बापू सोनवणे कार्यकारी संपादक पुणे/थेऊर: आज वैशाख महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊरच्या श्री चिंतामणी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली...

पुणे विमानतळाचे नवीन सुरक्षा क्षेत्र 95% पूर्ण झाले आहे परंतु ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी 2-3...

पुणे : शहरातील विमानतळाच्या नवीन सुरक्षा क्षेत्राचे 95% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, परंतु प्रवाशांना ही सुविधा कार्यान्वित होण्यासाठी जुलै अखेरपर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत...

स्नायूंच्या नुकसानीपासून ते चयापचय नफ्यापर्यंत: फिटनेस आणि त्वचेचे आरोग्य पुन्हा परिभाषित करणारी नॉन-आक्रमक तंत्रज्ञान...

पुणे: GLP-1 वेट-लॉस इंजेक्शनने जागतिक स्तरावर ट्रॅक्शन मिळवल्यामुळे, सखोल स्नायू तयार करणे आणि त्वचा टोनिंगसाठी डिझाइन केलेले नवीन, नॉन-इनवेसिव्ह तंत्रज्ञान सादर करणारे पुणे हे...

error: Content is protected !!