Homeक्राईमबिबवेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार..

बिबवेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार..

पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील अतिशय वर्दळीच्या चौकात चौघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. ही घटना बिबवेवाडी पोलिस चौकीपासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या वीर बाजी पासलकर कमानी खाली दिवसाढवळ्या दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.त्यामुळे पुण्यातील गुंडांना पोलिस, कायद्याचे अजिबात भय राहिले नसल्याचे पुन्हा सिध्द झाले.पवन सुभाष गवळी, वय २८ वर्ष राहणार बिबवेवाडी असे गोळबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पवन याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्लेखोर पळून गेले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पवन गवळी हे बॅण्ड पथक चालवितात. लग्नातील एका बॅण्ड पथकाची ऑर्डर घेऊन ते मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. संविधान चौकाकडून व्हीआयटी कॉलेजकडे जात असताना संविधान चौकाजवळच एका गल्लीतून चार हल्लेखोर चालत आले. त्यांपैकी दोघांच्या हातात पिस्तूल होती तर दोघांच्या हातात तलवाली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांनी पवन याला तलवारीचा धाक दाखवून थांबविले आणि काही बोलायच्या आतच दुसऱ्या दोघांनी पिस्तुलातील गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी पवन यांना लागली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!