Homeताज्या बातम्याबोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता सुनावणी १८ मार्चला

बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता सुनावणी १८ मार्चला

पुणे (शशिकांत पाटोळे) : बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याचा आदेश रद्द करण्यासाठी लावण्यात आलेली सुनावणी आता १८ मार्च रोजी होणार आहे. ही सुनावणी बुधवारी (दि. २५) होणार होती मात्र, दोन्ही बाजुंकडील पक्षकार सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने ही सुनावणी तीन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या मालकीच्या जमिनीवर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी कुळांची नावे लावण्याचा आदेश दिला होता. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने त्याविषयीचे फेरफार अंमलात येणार नाहीत यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधितांना निर्देश दिले होते. त्यानंतर येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.

मात्र, त्यानंतर येवले यांचे आदेश नियमानुसार रद्द करण्याची गरज होती. त्यानुसार पुण्याचे उपविभागीय अधिकारी सुनील जोशी यांनी सुनावणी घेण्यासाठी कृषी महाविद्यालय आणि दुसरे पक्षकार हेमंत गवंडे आणि विध्वांस कुटुंबीयांना नोटीस बजावली. मात्र, गवंडे आणि विध्वांस कुटुंबियांनी जोशी यांच्या सुनावणीवर आक्षेप घेत त्रयस्थ अधिकाऱ्याकडून सुनावणी घेण्याची मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्याकडे केली होती.

त्यानंतर राऊत यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संमतीने ही सुनावणी कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांच्या कार्यलयात होणार आहे. याबाबत डुडी यांनी टिळेकर यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आता ही सुनावणी बुधवारी (दि. २५) ठेवण्यात आली होती.

मात्र, गवंडे तसेच कृषी महाविद्यालय हे दोन्ही पक्षकार सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे टिळेकर यांनी ही सुनावणी पुढील तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलली. आता ही सुनावणी १८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘फक्त एक सिग्नल नाही’: लोहगडच्या कड्यावर केतनच्या शेवटच्या पोहोचण्यापासून सिया गोयलचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी...

सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22) यांना 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरील 25 वर्षीय केतन अग्रवालला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी...

आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ‘मोका’ गुन्ह्यातील ६ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन अट्टल आरोपींना गुन्हे...

​पुणे, दिनांक २९ जून २०२६: पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे. कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

error: Content is protected !!