Homeताज्या बातम्यामोक्का गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात

मोक्का गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात

: लोहगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका मोठ्या कारवाईत मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. संबंधित आरोपी गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
​नेमकी घटना काय?
दिनांक १५ जुलै २०२६ रोजी लोहगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार जंगम हे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गु.र.नं. ४०४/२०२५ मधील हवा असलेला आरोपी प्रणव शिंदे हा धानोरी येथील जकात नाक्याजवळील नाल्याजवळ उभा आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) आणि आर्म ॲक्टच्या विविध कलमांसह मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.
​मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने त्वरित सापळा रचून सायंकाळी ५.०० च्या सुमारास आरोपी प्रणव भागवत शिंदे (वय १९ वर्षे, रा. चौधरीनगर लेन नं.१०, शिवशक्ती मित्रमंडळाजवळ, मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे) याला शिताफिने ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी विमानतळ पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
​कारवाईत यांचा सहभाग:
ही महत्त्वपूर्ण कारवाई पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
​मार्गदर्शक: श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर), श्री. अबिनाश कुमार (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०७), आणि श्रीमती अनिता मोरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, पुणे शहर).
​नेतृत्व: श्रीमती मनीषा पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहगाव पोलीस स्टेशन) आणि श्री. राकेश कदम (पोलीस निरीक्षक – गुन्हे) यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
​तपास पथक: सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार अमित गायकवाड, अमोल आदलिंग, प्रितम जंगम, अल्पेश पोटकुले, दादासाहेब बर्डे, जोतीराम देवकाते, बाळासाहेब शिरसाठ, ज्ञानदेव आवारी, मोहन पालवे, शैलेश कुदळे, बबलु भिसे आणि दिनेश रसाळ यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात. पुणे बातम्या

विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद. पुणे बातम्या

कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार | पुणे बातम्या

पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

error: Content is protected !!