Homeताज्या बातम्यामौजे चांदे बु., तालुका कर्जत येथे काळवीट शिकार प्रकरण उघड; वनविभागाची व...

मौजे चांदे बु., तालुका कर्जत येथे काळवीट शिकार प्रकरण उघड; वनविभागाची व पोलिस विभागाची तातडीची संयुक्त कारवाई

मौजे चांदे बु., तालुका कर्जत येथे काळवीट शिकार प्रकरण उघड; वनविभागाची व पोलिस विभागाची तातडीची संयुक्त कारवाई

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

मौजे चांदे बु., तुकाई मंदिर परिसरातील अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात दिनांक 03 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजता काळवीट (Blackbuck) या अनुसूची-१ मधील संरक्षित वन्यप्राण्याची बेकायदेशीर शिकार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व संरक्षित क्षेत्रात घडलेली असल्याने वन व पोलिस विभागाने तात्काळ कारवाई केली आहे.गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व स्थानिक स्तरावर संशयास्पद हालचाली आढळून आल्याने वन विभाग व पोलीस विभाग यांच्यात तातडीने समन्वय साधण्यात आला. सदर कारवाई श्री. विवेक होशिंग, वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

श्री.संकेत उगले, वनपरिक्षेत्र अधिकारी मिरजगाव यांच्यासह सर्व बीट वनरक्षक व वन कर्मचारी यांचे संयुक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यामध्ये वनरक्षक सागर वाकचौरे, अजिनाथ नन्नवरे, हरिभाऊ बारगजे, दिनकर लिलके तसेच संबंधित संरक्षण मजूर यांनी सहभाग घेतला. तसेच करमाळा वनपरिक्षेत्रातील श्रीमती रोहिणी साळुंखे, वनपरिक्षेत्र अधिकारी करमाळा, वनरक्षक माधुरी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. घटनास्थळी पंचासमक्ष पाहणी केली असता खालील बाबी निदर्शनास आल्या, एक मादी काळवीट – मृत अवस्थेत (अंदाजे वय 2 वर्षे), एक बछडे – जखमी अवस्थेत (अंदाजे वय 3 महिने, पायास दुखापत), 1 दुचाकी वाहन, 2 वाघूर/ जाळी, 1 मोबाईल व इतर साहित्य.

सदर प्रकरणी मृत व जखमी काळवीट वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले असून स्पॉट पंचनामा व जप्ती पंचनामा करण्यात आलेला आहे. जखमी बछड्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. मृत मादी काळवीटाचे शवविच्छेदन करून अहवाल प्राप्त करण्यात येत आहे. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 मधील कलम कलम 2,9, 27(1),39(1),44(1)a, 50(5),51(1) अन्वये तसेच लागू इतर तरतुदींनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. काळवीट हा अनुसूची-१ मधील संरक्षित वन्यप्राणी असून कलम 51(1) अन्वये दोषी आढळल्यास किमान 3 वर्षे ते कमाल 7 वर्षे कारावास व दंडाची तरतूद आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास वन विभागामार्फत करण्यात येत आहे. पोलीस विभागाशी समन्वय ठेवून तपास प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत आहे. वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने स्थानिक नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. संशयास्पद हालचालींची माहिती वेळेवर प्राप्त झाल्यामुळे तातडीने कारवाई करणे शक्य झाले. वन विभाग सर्वसामान्य नागरिकांकडून मिळणाऱ्या गोपनीय माहितीवर तत्परतेने कार्यवाही करण्यास नेहमीच तयार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत ९० किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात. पुणे बातम्या

पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी. पुणे बातम्या

पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते. पुणे बातम्या

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

error: Content is protected !!